Tiger 3 Box Office Collection Day 6: सलमान खान, कतरिना कैफ व इमरान हाश्मी यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘टायगर ३’ चित्रपट दिवाळीच्या दिवशी (१२ नोव्हेंबर रोजी) सिनेमागृहात प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित होऊन आज सहा दिवस झाले आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी ४४ कोटींहून अधिक कमाई केली होती. त्यानंतर सातत्याने चित्रपटाने चांगली कामगिरी केली आहे. आता सहाव्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.

‘टायगर ३’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी ४४.५ कोटी, दुसऱ्या दिवशी ५९.२५, तिसऱ्या दिवशी ४४.३ कोटी, चौथ्या दिवशी २१.१ कोटी, पाचव्या दिवशी १८.५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. सहाव्या दिवसाच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार या चित्रपटाने जवळपास १३ कोटी रुपये कमावले आहेत. आधीच्या पाच दिवसांची कमाई पाहता हा आकडा खूप कमी आहे. पण चित्रपट रविवारी प्रदर्शित झाला होता, त्यामुळे आठवडाभर चांगली कमाई केली आहे, असं म्हणतात येईल. आज शनिवार व उद्या रविवारी वीकेंड आहे, या दोन दिवसांत चित्रपटाच्या कमाईत वाढ पाहायला मिळू शकते.

“मी शूटिंगचा भाग नव्हतो”, नाना पाटेकरांनी मारलेल्या चाहत्याने दिली संपूर्ण घटनेबाबत प्रतिक्रिया; म्हणाला, “त्यांनी मला…”

चित्रपटाने भारतात एकूण २००.६५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर जगभरात या सिनेमाने ३०० कोटींचा टप्पा गाठला आहे. चित्रपटाला पहिल्या वीकेंडचा फायदा झाल्यास एकूण कलेक्शन आणखी वाढेल. सहा दिवसांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास हा चित्रपट यंदाच्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक ठरला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सलमान खान व कतरिना कैफ यांच्या स्पाय सिनेमाचा हा तिसरा भाग आहे. यापूर्वी या फ्रेंचायजीचे ‘एक था टायगर’ व ‘टायगर जिंदा है’ हे चित्रपट आले होते. या दोन्ही भागांना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. त्यानंतर आता तिसऱ्या भागानेही चित्रपटगृहांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. या चित्रपटात हृतिक रोशन व शाहरुख खानचा कॅमिओदेखील आहे, तर आपल्या रोमँटिक भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या इमरान हाश्मीने यात खलनायकाची भूमिका साकारली आहे.