उर्फी जावेद ही तिच्या हटके स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते. ती आणि तिचे अतरंगी कपडे नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. पण सध्या तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ती आणि तिची धाकटी बहीण दिसत आहेत. परंतु यावेळी लक्ष उर्फीकडे न जाता तिच्या बहिणीवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

अलीकडेच उर्फी जावेद फॅशन डिझायनर गौरव गुप्ताच्या स्टोअर लॉन्च पार्टीत पोहोचली. त्यावेळी तिच्याबरोबर तिची धाकटी बहीण डॉली जावेदही आली होती. नेहमीप्रमाणे उर्फीने हटके फॅशनचे कपडे परिधान केले होते. पण तरीही तिच्या कपड्यांकडे कोणाचीही नजर गेली नाही. तर सर्वांच्या नजरा तिची बहीण डोली जावेद हिच्या साध्या आणि सिम्पल लूककडे वळल्या.

आणखी वाचा : दिवंगत अभिनेते इरफान खान यांच्या मुलामुळे उर्फी जावेदचं नुकसान, अभिनेत्री म्हणाली, “त्याला माझा हेवा वाटतो कारण…”

या पार्टीदरम्यानचा त्या दोघांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. उर्फी जावेदच्या बहिणीने पिवळ्या रंगाची साधी सिल्कची साडी नेसली होती आणि त्यावर त्याच रंगाचा ट्यूब स्टाईल ब्लाउज परिधान केला होता. आपला लूक अगदी साधा ठेवण्यासाठी डॉलीने फक्त हीलच्या चप्पल आणि छोटे कानातले घातले होते. तर केस मोकळे सोडले होते. तिने मेकअप देखील अगदी कमी केला होता.

हेही वाचा : Video: केक कापत नाही तर वडापाव खात श्रद्धा कपूरने साजरा केला तिचा वाढदिवस, म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यामुळे उर्फीच्या अगदी विरुद्ध स्टाईलमध्ये दिसणाऱ्या तिच्या बहिणीने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. या व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. उर्फीपेक्षा तिची बहीणच छान आणि सोबर दिसते असं अनेक जण म्हणाले. त्यामुळे आता बहिणी पुढे उर्फी फिकी पडलेली दिसली. उर्फी आणि डॉलीचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.