अभिनेत्री उर्वशी रौतेला हे तिच्या ग्लॅमर्स अंदाजामुळे ओळखली जाते. तिच्या कामाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यावरूनही बराचदा चर्चा रंगतात. बराच काळ तिचं नाव हे क्रिकेटर ऋषभ पंतशी जोडलं गेलं. पण आता ऋषभचा अपघात झाल्यानंतर रौतेला करत असलेल्या प्रत्येक कृतीचा संदर्भ ऋषभ पंतशी लावला जातोय.

उर्वशी सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करत असते. ऋषभ पंतचा अपघात झाल्यानंतरही त्याला लवकर बरं वाटावं यासाठी मी प्रार्थना करत आहे अशी पोस्ट तिने सोशल मीडिया वरून शेअर केली होती. या गोष्टीला चार दिवसही होत नाहीत तर तिने आज एक नवीन व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत ती तिच्या आईचा वाढदिवस साजरा करताना दिसतेय. आता तिच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आणखी वाचा : रितेश-जिनिलीयाचं ‘वेड’ प्रेक्षकांना भावलं, वर्षाच्या पहिल्याच दिवशी ‘इतके’ कोटी कमावत चित्रपटाची कौतुकास्पद कामगिरी

उर्वशी नवीन वर्षात स्वागत करण्यासाठी आणि तिच्या आईचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुटुंबीयांसोबत दुबईला रवाना झाली होती. बुर्ज खलिफा जवळच्या एका हॉटेलच्या टेरेसवर त्यांनी रात्री बारा वाजता केक कापत उर्वशीच्या आईचा वाढदिवस साजरा केला. तिने हा व्हिडीओ पोस्ट करताच नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

हेही वाचा : उर्वशी रौतेला परतली मायदेशी; फोटो पोस्ट करत म्हणाली, “माझं हृदय तुटतंय कारण…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओवर कमेंट करते का नेटकऱ्याने लिहिलं, “तिथे ऋषभ पंतचा अपघात झाला आहे…तो हॉस्पिटलमध्ये आहे आणि तू इथे पार्टी करतेस!” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “देख रहे हो बिनोद, वहा ऋषभ पंत का अॅक्सीडेंट हुआ और यहा पार्टी चल रही है|” तर आणखी एका नेटकऱ्याने लिहिलं, ” ऋषभ पंतची प्रकृती गंभीर आहे आणि तू इथे एन्जॉय करतेस… हेच आहे का तुझं खरं प्रेम?” तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.