यंदाच्या ‘कान्स २०२५’ या महोत्सवात अनेक भारतीय अभिनेत्रींनी आपली उपस्थिती दर्शवली होती. आलिया भट्ट, ऐश्वर्या रायसह अभिनेत्री उर्वशी रौतेलादेखील यंदाच्या कान्स महोत्सवात सहभागी झाली होती. यावेळी तिच्या रेड कार्पेटवरच्या ग्लॅमरस लूकची बरीच चर्चा झाली. उर्वशी रौतेलाने एक गाऊन परिधान केला होता, जो कान्स २०१८ मधील ऐश्वर्या रायच्या लूकशी मिळता जुळता होता.

ऐश्वर्या रायच्या या लूकशी साधर्म्य असलेला गाऊन परिधान केल्याने उर्वशीची ऐश्वर्या रायबरोबर तुलना होत आहे. याबद्दल उर्वशीने तिची प्रतिक्रिया दिली आहे. ऐश्वर्याशी तुलना करत असल्याचा बातम्यांवर टीका करणारी पोस्ट उर्वशीने शेअर केली आहे. या पोस्टमधून तिने असं म्हटलं आहे, “मी ऐश्वर्या राय बनण्याचा प्रयत्न करत आहे” असे दिसते? तर तसं नाही, ऐश्वर्या… ऐश्वर्या आहे. मी इथे कोणाचीही कॉपी बनण्यासाठी आलेली नाही.”

यापुढे तिने म्हटलं, “जर माझा लूक, माझी स्टाईल किंवा माझा आत्मविश्वास तुम्हाला अस्वस्थ करत असेल तर एक दीर्घ श्वास घ्या (किंवा दोन). मी प्रत्येकाची आवडती नाही, मी शॅम्पेनसारखी आहे. आणि माझ्या प्रतिमेबद्दल बोलायचं झालं तर, कोणी ती मोजली तर मोजमाप तुटेल. सर्व समीक्षकांनो – बोलत राहा, सर्व प्रतिभावान स्त्रियांनो – तुम्ही तुमची प्रतिभा गाजवत राहा आणि माझ्या स्वत:साठी – चमकत राहा, कारण तुझ्यासारखं कोणीही नाही.”

यासह उर्वशीचा हॉटेलच्या पायऱ्यांवर उभं राहून फोटो काढतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे तिला ट्रोल करण्यात येत आहे. डाईट सब्या या इन्स्टाग्राम पेजवरुन उर्वशीचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे आणि या व्हिडीओमध्ये तिचं नाव न घेता “फोटोसाठी सर्वांचा मार्ग अडवणारी ही पहिली महिला नाही” असं म्हटलं आहे. याबद्दलही उर्वशीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उर्वशीने ट्रोलर्सचे नाव न घेत असं म्हटलं, “मुखवटा असलेले अकाउंट्स कोणत्याही माहितीशिवाय खोटं पसरवतात आणि हे सर्व आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर देशाचे नाव उंचावणाऱ्यांना लक्ष्य करण्याचा एक मार्ग आहे. काही लोकांना हे पचवता येत नाही की, एका भारतीय अभिनेत्रीला जागतिक स्तरावर इतके कौतुक मिळत आहे.” यापुढे तिने मी ट्रोलर्सना ब्लॉक केले असून चाहत्यांनाही अशा अफवांकडे लक्ष देऊ नका, असे आवाहन केले आहे.