बॉलीवूड अभिनेता वरुण धवन बाबा झाला आहे. वरुण धवन व नताशा दलाल यांच्या घरी चिमुकल्या सदस्याचं आगमन झालं आहे. नताशाने आज बाळाला जन्म दिला असून वरुणचे बाबा व बाळाचे आजोबा डेव्हिड धवन यांनी आनंदाची बातमी दिली आहे.

आज दुपारी वरुण मुंबईतील रुग्णालयाबाहेर पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाला होता. तेव्हापासून वरुणच्या बाळाबद्दल चर्चा सुरू होती. नताशाची प्रसूती झाली असून तिने गोंडस लेकीला जन्म दिला आहे. डेव्हिड धवन यांनी बाळाची भेट घेऊन रुग्णालयातून निघताना नताशाने मुलीला जन्म दिल्याची माहिती दिली. डेव्हिड धवन यांचा व्हिडीओ वरिंदर चावला या पापाराझी अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. वरुण व नताशा यांना मुलगी झाली आहे, असं डेव्हिड धवन यांनी सांगितलं.

“मी आई झाले नाही कारण…”, मूल न होऊ देण्याबद्दल अरुणा इराणींनी सोडलं मौन; म्हणाल्या, “विवाहित पुरुषाशी…”

वरुण धवन व नताशा लग्नानंतर तीन वर्षांनी आई- बाबा झाले आहेत. फेब्रुवारी महिन्यात वरुण व नताशा यांनी ते आई- बाबा होणार असल्याची बातमी सोशल मीडियावर पोस्ट करून शेअर केली होती. वरुणने नताशा व त्याचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. फोटोमध्ये वरुण गरोदर नताशाच्या बेबी बंपचे चुंबन घेताना दिसत होता. हा फोटो शेअर करत त्याने “आम्ही प्रेग्नंट आहोत, आम्हाला तुमच्या प्रेमाची व आशीर्वादाची गरज आहे,” असं लिहिलं होतं. सेलिब्रिटी व चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट करत दोघांचे अभिनंदन केले होते.

स्मिता पाटील यांच्या कांजीवरम साड्यांपासून बनवलेला सूट घालून लेक प्रतीक पोहोचला Cannes मध्ये, पाहा खास Photos

२४ जानेवारी २०२१ ला वरुण व नताशा लग्नबंधनात अडकले होते. फक्त ५० लोकांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला अलिबागच्या द मॅन्शन रिसॉर्टमध्ये पार पडला होता. वरुण व नताशा लहानपणापासूनचे मित्र-मैत्रीण आहेत. लग्नाआधी दोघांनी बरीच वर्षे एकमेकांना डेट केलं होतं. वरुणने त्याच्या करिअरच्या सुरूवातीला नताशा आणि त्याच्या रिलेशनशिपबद्दल जाहीर केलं नव्हतं. मात्र दोघे बऱ्याचवेळा एकत्र दिसायचे. काही वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी २०२१ साली लग्न केलं. आता तीन वर्षांनी दोघे आई-बाबा झाले आहेत. त्यांच्या घरी चिमुकल्या मुलीचं आगमन झालं आहे.

‘पंचायत ३’ नंतर या आठवड्यात OTT वर येणार जबरदस्त चित्रपट अन् वेब सीरिज, वाचा पूर्ण यादी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नताशा व वरुण आई -बाबा झाल्याचं कळताच सोशल मीडियावर नेटकरी दोघांचं अभिनंदन करत आहेत. मुलीच्या जन्मानिमित्त वरुण व नताशाला चाहते शुभेच्छा देत आहेत.