बॉलीवूडचा सुपरस्टार वरुण धवन सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. वरुण धवनची पत्नी नताशा दलाल गरोदर असल्याची बातमी एका महिन्यापूर्वी सांगून वरुणने चाहत्यांना सुखद धक्का दिला. नुकत्याच पार पडलेल्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यालाही या कपलने हजेरी लावली होती. अशातच आता नताशा दलाल मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे.

नताशा दलालचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडीओत नताशा तिच्या वहिनीबरोबर म्हणजेच वरुणच्या मोठ्या भावाच्या पत्नीबरोबर दिसतेय. यात नताशाने गुलाबी रंगाचा ड्रेस आणि सफेद रंगाचा ब्लेझर घातला आहे. मॅचिंग पर्स, खुले केसं, आणि बेबी बम्प फ्लॉंट करताना नताशा दिसतेय. पण, चाहत्यांचं लक्ष तिच्या सॅंडल्सने वेधून घेतलं आहे.

नताशाने हिल्स घातल्याने नेटकरी संतप्त झाले आहेत. अनेकांनी कमेंट्समध्ये आपल्या प्रतिक्रिया मांडल्या आहेत. “गरोदर असून तिने हिल्स घातल्या आहेत”, “पोटात बाळ आहे आणि नताशाने हिल्स घातल्या आहेत”, अशा अनेक नकारात्मक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, नताशा दलाल वरुण धवनबद्दल सांगायचं झाल्यास, अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २४ जानेवारी २०२१ रोजी दोघांचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला. लग्नाच्या तीन वर्षांनंतर आता नताशा दलाल लवकरच गुड न्यूज देणार आहे. १८ फेब्रुवारी २०२४ रोजी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत वरुणने ही आनंदाची बातमी दिली. या फोटोला कॅप्शन देत वरुणने लिहिले, “आम्ही गरोदर आहोत, आता आम्हाला तुमच्या आशीर्वादाची आणि प्रेमाची गरज आहे.”