Vicky Kaushal Shahrukh Khan Dance Video : मनोरंजन विश्वात मानाचा समजला जाणारा आयफा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. यावर्षी या सोहळ्याचं होस्टिंग बॉलीवूड अभिनेता विकी कौशल आणि शाहरुख खानने केलं. या दोघांच्या अनोख्या जुगलबंदीने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. याशिवाय सध्या या दोघांच्या डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

१९९८ मध्ये म्हणजेच बरोबर २६ वर्षांपूर्वी शाहरुख खानचा ‘डुप्लिकेट’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामध्ये शाहरुख खानसह अभिनेत्री जुही चावला आणि सोनाली बेंद्रे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या ‘डुप्लिकेट’ चित्रपटातलं “मेरे महबूब, मेरे सनम…शुक्रिया, मेहरबानी, करम” हे गाणं आजही सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे. या गाण्याची लोकप्रियता लक्षात घेऊनच नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘बॅड न्यूज’ चित्रपटात हे गाणं रिमिक्स करून नव्या रुपात पुन्हा एकदा प्रदर्शित करण्यात आलं.

हेही वाचा : Bigg Boss संपल्यावर ‘कलर्स मराठी’वर नव्या मालिकांची नांदी! आणखी एक प्रोमो आला समोर; ५ अभिनेत्री एकत्र झळकणार

विकी कौशल आणि शाहरुख खानचा जबरदस्त डान्स

‘बॅड न्यूज’ चित्रपट १९ जुलै २०२४ रोजी प्रदर्शित झाला. यामध्ये विकी कौशल, तृप्ती डिमरी आणि एमी विर्क यांच्या प्रमुख भूमिका होत्या. “मेरे महबूब, मेरे सनम…” गाण्याचं नवीन व्हर्जन प्रेक्षकांना या चित्रपटात ऐकायला मिळालं. गेल्या काही दिवसांपासून इन्स्टाग्राम रील्सवर हे गाणं प्रचंड व्हायरल होत आहे. अशातच आता शाहरुख-विकीने ( Vicky Kaushal Shahrukh Khan ) याच सदाबहार गाण्यावर एकत्र डान्स करत सर्वांचं मन जिंकून घेतलं आहे.

Vicky Kaushal Shahrukh Khan
Vicky Kaushal Shahrukh Khan – विकी कौशल आणि शाहरुख खान यांचा डान्स

नुकत्याच पार पडलेल्या आयफा पुरस्कार ( iifa awards 2024 ) सोहळ्यात विकी कौशल आणि शाहरुख खान ( Vicky Kaushal Shahrukh Khan ) यांनी एकत्र येऊन जबरदस्त डान्स केल्याचं पाहायला मिळालं. हुबेहूब हुकस्टेप्स करत विकी कौशल आणि शाहरुख खानने उपस्थित प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर लाइक्स व कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

हेही वाचा : “मी सूरजचं पालकत्व…”, घराबाहेर जाताना पंढरीनाथ कांबळेने सांगितला मोठा निर्णय; सर्वत्र होतंय कौतुक

View this post on Instagram

A post shared by Dharma Productions (@dharmamovies)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी “दोन फेव्हरेट अभिनेते एका फ्रेममध्ये…”, “या दोघांची केमिस्ट्री खरंच जबरदस्त आहे”, “हे पाहण्यासाठी आम्ही इंटरनेटचं बिल भरतो”, “शाहरुख खान आणि विकी कौशलचा ब्रोमान्स”, “विकीसाठी हे एखाद्या स्वप्नसारखे आहे” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.