कतरिना कैफ आणि विकी कौशल ही बॉलीवूडमधील लोकप्रिय जोडी आहे. डिसेंबर २०२१ मध्ये लग्नगाठ बांधत त्यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली. मात्र, विकी-कतरिनाने अद्याप एकाही चित्रपटात एकत्र काम केलेले नाही. कतरिना कैफने काम केलेल्या एका चित्रपटासाठी विकीने ऑडिशन दिली होती परंतु त्याला नकार देण्यात आला. तो चित्रपट नेमका कोणता आहे जाणून घेऊयात…

हेही वाचा : “‘लस्ट स्टोरीज २’ कुटुंबाबरोबर बघा”, विजय वर्माचा सल्ला ऐकून नेटकरी भडकले; म्हणाले, “मनोरंजनाच्या नावाखाली सॉफ्ट पॉर्न…”

शाहरुख खान आणि कतरिना कैफ यांच्या ‘जब तक है जान’ या चित्रपटात अभिनेता शारिब हाश्मीने शाहरुख खानच्या जवळच्या मित्राची म्हणजेच ‘जैन मिर्झा’ची भूमिका साकारली होती. या ‘जैन मिर्झा’च्या भूमिकेसाठी अभिनेता विकी कौशलने सुद्धा ऑडिशन दिली होती. मात्र, पुढे त्याला या भूमिकेसाठी नकार कळवण्यात आला. त्यानंतर चित्रपटात ही भूमिका शारिबने साकारली.

हेही वाचा : “माझी ड्रॅगन क्वीन”, सई ताम्हणकरच्या वाढदिवशी बॉयफ्रेंड अनिश जोगने शेअर केला खास व्हिडीओ, म्हणाला…

विकी कौशल आणि सारा अली खानच्या अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपटात शारिब सुरक्षा रक्षकाच्या भूमिकेत दिसला होता. अलीकडेच ‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीत शारिब हाश्मीने ‘जब तक है जान’च्या भूमिकेबाबत खुलासा केला. शारिब म्हणाला, विकी कौशलने ‘जब तक है जान’साठी शाहरुखच्या जिवलग मित्राच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती. पण चित्रपटाच्या टीमला, निर्मात्यांना विकी कौशल ‘जैन’च्या भूमिकेसाठी योग्य वाटला नाही आणि त्याला नाकारण्यात आले.

हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रियदर्शनी इंदलकरने मागितली चाहत्यांची माफी; वाढदिवसानंतर शेअर केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाहरुखचा ‘जब तक है जान’ चित्रपट २०१२ साली प्रदर्शित झाला होता. यामध्ये शाहरुख खान, कतरिना कैफ, अनुष्का शर्मा यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. दरम्यान, ‘जरा हटके जरा बचके’ मधील भूमिकेबाबत शारिब एएनआयशी संवाद साधताना म्हणाला, “जेव्हा मला सुरक्षा रक्षकाच्या भूमिकेची ऑफर देण्यात आली होती, तेव्हा तो माझ्या मनात अनेक शंका होत्या कारण, चित्रपटात माझी एन्ट्री मध्यांतरानंतर होणार होती. तरीही ही ऑफर स्वीकारली.”