कतरिना कैफ आणि विकी कौशल ही जोडी बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडींपैकी एक आहे. विकी-कतरिनाने डिसेंबर २०२१मध्ये लग्नगाठ बांधत त्यांच्या नवीन आयुष्याला सुरुवात केली. यंदा विकी-कतरिना लग्नानंतरची पहिलीच दिवाळी साजरी करत आहेत. दिवाळीच्या सणात येणारं लक्ष्मीपूजनही त्यांनी एकत्र केलं.

विकी-कतरिनाने राहत्या घरी लक्ष्मी मातेच्या प्रतिकृतीची पूजा केली. कतरिनाबरोबरचा लक्ष्मीपूजन करतानाचा एक फोटो विकीने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला आहे. फोटोमध्ये विकी-कतरिना लक्ष्मीपूजन करताना दिसत आहेत. फोटोच्या कॅप्शनमध्ये विकीने कतरिनाचा ‘लक्ष्मी’ असा उल्लेख केला आहे. “घरातील लक्ष्मीसह लक्ष्मीपूजन केले. आमच्याकडून तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा”, असं कॅप्शन विकीने फोटोला दिलं आहे. विकीच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा >> “बॉलिवूडच्या बादशहाने माझा हात हातात घेतला अन्…”, सायली संजीवने सांगितला शाहरुख खान भेटीचा किस्सा

कतरिनानेही तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन लग्नानंतरच्या पहिल्या दिवाळीचे फोटो शेअर केले आहेत. विकी कौशल आणि कतरिनाच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे. लग्नानंतरच्या पहिल्या दिवाळी सणासाठी कतरिना आणि विकी पारंपरिक पेहरावात दिसून आले. कतरिनाने साडी नेसून ग्लॅमरस लूक केला होता. तर विकीने शेरवानी परिधान केली होती.

हेही वाचा >> रस्त्यावरील छोट्या मुलीला पैसे दिल्यानंतर दुसरा मुलगाही काजोलच्या गाडीमागे धावला अन्…; पाहा व्हिडीओ

हेही पाहा >> Photos : विजय देवरकोंडाचा फोटो पाहताच सायली संजीव लाजली, म्हणाली “माझं तुझ्यावर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विकी-कतरिना जोडीचे लाखो चाहते आहेत. विकी कौशलने कतरिनासह बॉलिवूडमधील दिवाळी पार्टीतही हजेरी लावली होती. दिवाळी पार्टीतील त्या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कतरिना ‘फोन भूत’ तर विकी कौशल ‘सॅम बहादूर’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर विकी कौशल