कतरिना कैफ व विकी कौशल हे बॉलीवूडमधील लोकप्रिय कपल आहे. डिसेंबर २०२१ मध्ये लग्नगाठ बांधत त्यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली. ९ डिसेंबरला त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं. दरम्यान, विकीने आपल्या वैवाहिक आयुष्याशी निगडित एका गोष्टीचा खुलासा केला आहे.
विकी म्हणाला, “सर्वात मजेदार गोष्ट म्हणजे जेव्हा कतरिना दर आठवड्याला स्टाफ मीटिंग घेते. ती संपूर्ण स्टाफला एकत्र बोलावते आणि घराच्या बजेटपासून इतर सर्व गोष्टींवर चर्चा करते. पैसे कसे आणि कुठे खर्च केले जातात याचा हिशेब ठेवते. जेव्हा ही चर्चा होते तेव्हा मला खूप मजा येते. मी पॉपकॉर्न खात या मीटिंगचा आनंद घेत असतो.”




कतरिना गरोदर असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या होत्या. मात्र, या चर्चांवर विकी कौशलच्या टीमने मौन सोडत स्पष्टीकरणं दिलं होतं. ‘या सर्व चर्चा केवळ अफवा आहे. सोशल मीडियावर पसरवली गेलेल्या बातम्या खोट्या आहेत आणि यात कोणतंही तथ्य नाही,’ असं सांगण्यात आलं होतं.
हेही वाचा- नसीरुद्दीन शाह यांना काँग्रेसने दिलेली ‘ही’ ऑफर; मुलाखतीदरम्यान अभिनेत्याचा खुलासा
कतरिना आणि विकीच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर विकीचा ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपट २ जून रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. या चित्रपटाने २२ कोटींहून अधिक कमाई केली आहे. कतरिना कैफ लवकरच ‘टायगर ३’मध्ये दिसणार आहे. यामध्ये तिच्याबरोबर सलमान खान मुख्य भूमिकेत आहे. तसेच ती ‘फोन भूत’, ‘मेरी क्रिसमस’ मध्येही झळकणार आहे.