विकी कौशल व कतरिना कैफ हे बॉलीवूडमधील लोकप्रिय जोडपं आहे. दोघांनी दोन वर्षांपूर्वी लग्नगाठ बांधली. लग्न केल्यानंतर अनेकदा ते त्यांच्या संसाराबद्दल बोलत असतात. मुलाखतींमध्ये त्यांना एकमेकांबद्दल विचारण्यात येतं. तेव्हा ते आयुष्यातील लहान लहान गोष्टी शेअर करत असतात. नुकतंच विकीने कतरिनाला राक्षस म्हटलं.

“लोक धक्के देत होते, ढकलत होते”, फराह खानने लालबागचा राजाच्या दर्शनाला गेल्यावरचा अनुभव, म्हणाली, “मला फक्त…”

विकी कौशलने ‘बॉलीवूड बबल’ला मुलाखत दिली. विकीला त्याच्या कुटुंबातील सर्वात शिस्तप्रिय व्यक्तीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्याने कतरिना कैफचं नाव घेतलं. विकीने म्हटलं की तो आळशी आहे पण कतरिना खूपच शिस्तप्रिय आहे. विकी म्हणाला, “जेव्हा आम्ही दोघे घरी असतो आणि आम्हाला कामासाठी बाहेर जायचं नसतं तेव्हा आम्ही दोघेही आळशी असतो. पण तो आळशीपणाही सुंदर आहे. हे खरोखर दोन आळशी लोकांच्या पार्टीसारखे असते. परंतु जेव्हा काम असतं आणि शिस्तप्रिय व्हायची वेळे येते तेव्हा ती अगदी राक्षसासारखी आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, कतरिना व विकी यांनी २०२१ मध्ये लग्न केलं होतं. लग्नापूर्वी काही काळ दोघांनी एकमेकांना डेट केलं होतं. त्यानंतर कतरिनाने लग्नासाठी विकीला होकार दिला होता. कतरिना व विकी दोघेही सोशल मीडियावर फोटो शेअर करत असतात. विकी तर बऱ्याच मुलाखतींमध्ये पत्नीचं कौतुक करत असतो.