Sam Bahadur Box Office Collection Day 12: १ डिसेंबर या दिवशी बॉक्स ऑफिसवर एक जबरदस्त टक्कर पाहायला मिळाली. रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेला ‘अ‍ॅनिमल’ आणि विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला ‘सॅम बहादुर’ हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी एकमेकांसमोर उभे ठाकले. ‘अ‍ॅनिमल’ने विकीच्या ‘सॅम बहादुर’ला सगळ्याच बाबतीत मागे पछाडलं असलं तरी विकीच्या चित्रपटानेही चांगली कमाई बॉक्स ऑफिसवर केली आहे.

‘अ‍ॅनिमल’ने बॉक्स ऑफिसवर ७०० कोटींची कमाई केली तर ‘सॅम बहादुर’नेही बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. भारताचे पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशा यांच्या जीवनावर हा चित्रपट बेतलेला होता. ‘अ‍ॅनिमल’वरुन निर्माण झालेला वाद आणि एकूणच सोशल मीडियावर पाहायला मिळणारे दोन भिन्न मतप्रवाह यामुळे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई जरी केली असली तरी या वादळात विकी कौशलचा ‘सॅम बहादुर’ही घट्ट पाय रोवून बॉक्स ऑफिसवर उभा आहे.

आणखी वाचा : ‘अ‍ॅनिमल’नंतर बॉबी देओल करणार तमिळ चित्रपटात पदार्पण; सूर्याच्या ‘या’ बिग बजेट चित्रपटात साकारणार हटके भूमिका

‘सॅकनिल्क ट्रॅकर’च्या रीपोर्टनुसार ‘सॅम बहादुर’ने १२ व्या दिवशी २.४० कोटींचा व्यवसाय केला आहे. सोमवारच्या तुलनेत या चित्रपटाने मंगळवारी चांगली कमाई केली असून या चित्रपटाचे एकूण कलेक्शन ६१.१० कोटी आहे. तर ५५ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘सॅम बहादुर’ने जगभरात ८१.८० कोटींची कमाई केली असल्याचं स्पष्ट झालं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता यापुढे ‘सॅम बहादुर’च्या कलेक्शनमध्ये फार वाढ होणार नाही अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण आता पुढच्याच आठवड्यात शाहरुख खानचा ‘डंकी’ आणि प्रभासचा ‘सालार’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामुळे ‘अ‍ॅनिमल’ बॉक्स ऑफिसवर टिकून राहू शकतो, परंतु ‘सॅम बहादुर’ला मात्र बॉक्स ऑफिसवरुन गाशा गुंडाळावा लागणार असल्याचं चित्र दिसत आहे. ‘सॅम बहादुर’मध्ये विकी कौशलसह फातीमा सना शेख, सान्या मल्होत्रा, नीरज काबीसारखे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.