विद्या बालनने आलिया भट्टचा सुपरहिट चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी’वरून दिग्दर्शक संजय लीला भन्साळींवर ताशेरे ओढले आहेत. हा चित्रपट सुपरहिट झाला, त्या यशाचे सर्व श्रेय फक्त दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनीच का घेतले, असा प्रश्न तिने उपस्थित केला आहे. तसेच हिट चित्रपट दिल्यानंतर अभिनेत्यांचे ज्या पद्धतीने कौतुक केले जाते, त्याप्रमाणे आलिया भट्टचं कौतुक झालं नाही. हा एकप्रकारे आलिया भट्टला कमी लेखण्याचा प्रकार असल्याचंही विद्या म्हणाली.

“भारतात दररोज लैंगिक तस्करीसाठी…” भाजपा मंत्र्याला अशिक्षित म्हणत सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडचा ‘पठाण’ला पाठिंबा

‘फिल्म कंपॅनियन’ने घेतलेल्या गोलमेज मुलाखतीत विद्या म्हणाली, “गंगूबाई चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी कशी केली? जर एखाद्या अभिनेत्रीचा चित्रपट चांगला चालला असेल तर त्याचं श्रेय दिग्दर्शकाने घेणं आणि हे हास्यास्पद आहे.” यावेळी विद्याने अभिनेत्री चित्रपटांसाठी घेत असलेल्या मेहनतीबद्दलही बोलली. ती म्हणाली, “आम्ही अभिनेत्रींनी आज एक विशिष्ट स्थान मिळवण्यासाठी खूप मेहनत केली. इंडस्ट्रीतील खूप साऱ्या अभिनेत्री त्यांच्या चित्रपटांसाठी प्रचंड मेहनत घेत आहेत. करोना नंतरच्या काळात अभिनेत्यांचे चित्रपट चालत नाहीयेत, पण तरीही ते अचानक मागे फिरतात आणि आमच्याकडे बोट दाखवून म्हणतात की अभिनेत्रींचे चित्रपटही जास्त चालणार नाहीत. हे किती हास्यास्पद आहे. हे पाहून मला खरंच प्रश्न पडतो की तसं असेल तर मग गंगूबाई काठियावाडी चित्रपटाचं काय? या चित्रपटाने अनेक अभिनेत्यांच्या चित्रपटांपेक्षा जास्त चांगली कामगिरी केली आहे.”

“तेव्हा मी माझ्या मुलांना कवटाळून रडायचो…” शाहरुख खानने सांगितला ‘तो’ किस्सा

“अभिनेत्री केंद्रित चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालणार नाही, हे सांगण्यासाठी करोना महामारी हे एक सोपं निमित्त बनलं आहे, कारण मुळात आमचा चित्रपट उद्योग एका प्रकारच्या प्रवाहातून जात आहे. आमचे चित्रपट फ्लॉप होत आहेत, तेच चित्रपट ज्यामध्ये अभिनेत्यांच्या मुख्य भूमिका आहेत, पण तरीही ते मान्य केलं जातं नाही,” असं विद्या म्हणाली.

“…हे पाहून मी थक्क झालो”, परेश रावल यांनी सांगितली शरद पवारांची ‘ती’ आठवण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०२२मध्ये बॉलिवूडचे अनेक दिग्गज अभिनेत्यांचे बिग बजेट चित्रपट फ्लॉप होत असताना आलियाच्या चित्रपटांनी चांगली कामगिरी केली. यामध्ये तिचा ‘गंगूबाई काठियावाडी’, ‘RRR’, ‘डार्लिंग्स’ आणि ‘ब्रह्मास्त्र’चा समावेश होता. याशिवाय तिने तिचा आपला पहिला हॉलिवूड चित्रपट ‘हार्ट ऑफ स्टोन’चे शूटिंग देखील यावर्षी पूर्ण केले.