२०२३मध्ये सुपरहिट झालेल्या चित्रपटांपैकी एक म्हणजे 12th fail. या चित्रपटात नायकाची भूमिका साकारणाऱ्या विक्रांत मेस्सीला सर्वोत्कृष्ट अभिनेता या पुरस्काराने गौरविण्यात आलं. अनेक दिग्गज कलाकारांनी या चित्रपटाचं कौतुक केलं. अभिनय क्षेत्रात सुरू असलेल्या प्रवासाबरोबरच विक्रांतचा वैयक्तिक आयुष्यातला प्रवासही सुरू झाला होता, कारण विक्रांत नुकताच बाबा झाला होता. पिता झाल्यानंतर आयुष्य कसं बदललं याबद्दल एका मुलाखतीत त्याने सांगितलं आहे.

नुकत्याच झालेल्या पिंकविलाच्या पुरस्कार सोहळ्यात विक्रांतने हजेरी लावली होती. तिथे दिलेल्या मुलाखतीत विक्रांत म्हणाला, “माझ्या बाळाचे ढेकर काढून घेण्यात, बाळाचे डायपर्स बदलण्यात मी एवढा माहीर असेन असं मला वाटलं नव्हत. मला वाटतं की, बाळाची जबाबदारी घेणे हे माझे कर्तव्य आहे आणि मी हे सगळं करण्यात आता तज्ज्ञ झालो आहे.”

A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
Rohit Sharma Talking about his retirement in the Breakfast with Champions show
रोहित शर्मा कधी म्हणणार क्रिकेटला अलविदा? हिटमॅनने निवृत्तीबाबत केलं मोठं वक्तव्य
second wife of an invalid marriage may not complain of harassment but of dowry
अवैध लग्नाची दुसरी पत्नी छ्ळाची नाही, पण हुंड्याची तक्रार करू शकते

पहिल्यांदाच वडील होण्याची भावना शेअर करत विक्रांत म्हणाला, “ज्याचे मी स्वप्न पाहिलं होतं तसचं आयुष्य मी आता जगतोय. परंतु, ही भावना मी शब्दांत मांडू शकत नाही; कारण ही भावना शब्दांत मांडण्यापेक्षाही अधिक आहे.”

हेही वाचा… विकी कौशलच्या आईला आवडते सूनबाईची ‘ही’ सवय; अभिनेता म्हणाला, “जेव्हा कतरिना घरी…”

विक्रांत मेस्सी आणि शीतल ठाकूर २०२२ रोजी लग्नबंधनात अडकले. लग्नाच्या दोन वर्षांनंतर ७ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला. काही आठवड्यांनंतर या कपलने त्यांच्या मुलाचे नाव घोषित केले आणि तिघांचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत लिहिले, “आमचा मुलगा आमच्यासाठी आशीर्वादापेक्षा काही कमी नाही. आमच्या मुलाचे नाव आम्ही वरदान ठेवले आहे.”

हेही वाचा… वरुण धवनची पत्नी नताशा दलाल ‘या’ कारणामुळे होतेय ट्रोल; नेटकरी म्हणाले, “गरोदर असून…”

दरम्यान, विक्रांतच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, विक्रांत ‘12th fail’ या चित्रपटात झळकला होता. हा चित्रपट आयपीएस अधिकारी मनोज शर्मा यांच्या जीवनावर आधारित आहे. ‘12th fail’ बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आणि विक्रांतच्या भूमिकेचं अनेकांनी कौतुक केले. ‘द साबरमती रिपोर्ट’या आगामी चित्रपटात विक्रांत दिसणार आहे.