Virat Kohli And Anushka Sharma Welcome Baby Boy : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने नुकतीच इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत त्यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. १५ फेब्रुवारीला अनुष्काने एका गोंडस मुलाला जन्म दिला. बाळाचा जन्म झाल्यावर पाच दिवसांनी विरुष्काने ही गोड बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.

विराट कोहली व अनुष्का शर्माने त्यांच्या लाडक्या लेकाचं नाव ‘अकाय’ असं ठेवलं आहे. या जोडप्याने लेकाचं नाव जाहीर केल्यावर सोशल मीडियावर या अनोख्या नावाचा अर्थ काय बरं असेल? याची चर्चा रंगली आहे. हिंदी शब्दकोश व संस्कृत भाषेनुसार ‘अकाय’ नावाचा अर्थ ‘निराकार’ असा होतो. ज्याला कोणतंही स्वरुप, देह व आकार नाही असा निराकार. याशिवाय तुर्की भाषेनुसार या नावाचा अर्थ तेजस्वी किंवा चमकणारा चंद्र (shining moon) असा होतो.

हेही वाचा : ‘बिग बॉस’ फेम दिव्या अग्रवालने चेंबूरमध्ये राहत्या घरी मराठमोळ्या बॉयफ्रेंडशी बांधली लग्नगाठ! फोटो शेअर करत म्हणाली…

विराट-अनुष्काने ‘अकाय’ नाव का ठेवलं याबद्दल अद्याप पुष्टी केलेली नाही. पोस्टमध्ये अभिनेत्रीने फक्त लेकाचं नाव काय ठेवलं याबद्दल खुलासा केला आहे. तसेच या आनंदाच्या प्रसंगी आमच्या प्रायव्हसीचा आदर करा अशी विनंती विरुष्काने त्यांच्या सर्व चाहत्यांना केली आहे.

हेही वाचा : विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन, बाळाचं नाव ठेवलं…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, एकमेकांना अनेक वर्षे डेट केल्यावर २०१७ मध्ये विराट-अनुष्काने लग्नघाठ बांधली होती. दोघेही पॉवर कपल म्हणून ओळखले जातात. २०२१ मध्ये अनुष्काने वामिकाला जन्म दिला. आता सर्वत्र विराट-अनुष्काच्या दुसऱ्या बाळाची चर्चा चालू झाली आहे. सोशल मीडियावर विरुष्काने शेअर केलेली पोस्ट सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. सगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी विराट-अनुष्कावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.