टी-२० वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करून इतिहास रचला. एका बाजूला भारतीय संघाच्या जेतेपदामुळे क्रिकेटप्रेमींचा आनंद गगनात मावेनासा झाला होता; तर दुसरीकडे भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं त्याच्या टी-२० मधून निवृत्ती जाहीर केली त्यामुळे हळहळही व्यक्त केली जात आहे.

भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयानंतर विराटचा हा निर्णय ऐकून सामान्य माणसांसह कलाकारदेखील थोडे निराश झाले. या बातमीनंतर अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर आपल्या भावना शेअर केल्या आहेत. बॉलीवूडचा सुपरस्टार रणवीर सिंगने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर खास स्टोरी शेअर करीत टीम इंडियाचं या विजयाबद्दल अभिनंदन केलं आणि ‘सामनावीर’ विराट कोहलीला निरोप दिला.

हेही वाचा… …आणि म्हणून अमिताभ बच्चन यांनी टी-२० वर्ल्डकपचा अंतिम सामना पाहिला नाही, म्हणाले, “मी जेव्हा…”

सोशल मीडियावर पहिली पोस्ट शेअर करीत रणवीरनं लिहिलं, “किंग कोहलीनं शेवटी त्याचा एक्का टाकून विजय मिळवलाच. विराट कोहलीची ही कारकीर्द या टप्प्याला येऊन पोहोचवण्याचा त्याचा हा प्रवास अविश्वसनीय आहे.”

रणवीरनं विराटसह अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, अर्शदीप सिंग, हार्दिक पांड्या यांचंदेखील कौतुक केलं. तर, रोहित शर्माबद्दल एक वेगळी पोस्ट शेअर करीत “रोहितबद्दल व्यक्त होण्यासाठी माझ्याकडे शब्दांचा साठा अपुरा आहे”, असं कॅप्शन दिलं.

रणवीरनं तिसरी स्टोरी शेअर करीत लिहिलं, “टीम इंडियाचा हा विजय अतिशय कौतुकास्पद आहे. हरत असलेल्या या मॅचमध्ये ताकदीनं लढून जेतेपद मिळवणं म्हणजे क्रिकेट चॅम्पियन राहुल द्रविड यांना ही मॅच समर्पित करणं असंच आहे.”

टीम इंडियाचा हा विजय साजरा करताना विवेक ओबेरॉयनं त्याच्या एक्स अकाउंटवर कोहलीच्या टी-२० वर्ल्ड कपमधल्या या शेवटच्या सामन्याबद्दल दुःख व्यक्त केलं आणि लिहिलं, “इमोशनल अत्याचार झाल्यासारखं वाटत आहे. टीम इंडियाच्या विजयाच्या एका बाजूला मी आनंद साजरा करतो आहे; तर दुसर्‍या बाजूला विराट कोहलीनं हा त्याच्या टी-२० वर्ल्ड कपचा शेवटचा सामना असल्याचं घोषित केलं. त्यामुळे एकाच वेळी जिंकलो आणि हरलो, असं वाटतंय. टी-२० मध्ये आमच्या सुपरहीरोची आम्हाला आठवण येईल.”

हेही वाचा… T-20 Worldcup: “दिल जीत लिया…”, सलमान खान, रणवीर सिंग ते विकी कौशल; ‘या’ बॉलीवूड कलाकारांनी केलं भारतीय संघाचं कौतुक, भावुक होत म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रणवीर आणि विवेकसह अनेक कलाकार विराटच्या या निवृत्तीमुळे निराश झाले आहेत. “विराट कोहलीनं नुकतीच टी-२० मधून निवृत्ती घेतली का?”, असं ट्वीट अर्जुन रामपालनं एक्स अकाउंटवर शेअर केलं.