Avneet Kaur Viral Video after Virat Kohli Retirement : क्रिकेटचा किंग विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. विराटने अचानक इन्स्टाग्रामवर निवृत्ती जाहीर करत सर्वांना धक्का दिला. त्याच्या या निर्णयामुळे त्याचे चाहते धक्क्यात आहेत. अनेक कलाकार विराटच्या निवृत्तीवर प्रतिक्रिया देत आहेत. याचदरम्यान अभिनेत्री अवनीत कौरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओत ती तिच्या मित्रांबरोबर विराटला चिअर करताना दिसतेय.

बॉलीवूड अभिनेत्री व सोशल मीडिया स्टार अवनीत कौर मागच्या काही दिवसांपासून विराट कोहलीमुळे चर्चेत आहे. अवनीतच्या फॅन पेजने शेअर केलेली तिची एक पोस्ट विराटने लाईक केली होती. त्यानंतर विराटने याबद्दल स्पष्टीकरणही दिलं होतं. आता विराटच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर अवनीतचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय.

या व्हायरल व्हिडीओमध्ये अवनीत कौर ‘कोहली, कोहली!’ असं ओरडून विराटला चिअर करताना दिसतेय. तिच्याबरोबर मुनव्वर फारुकी व शहनाज गिलदेखील आहेत. शेवटी ती हाताने हार्ट क्रिएट करून फ्लाइंग किसही देत आहे.

पाहा व्हिडीओ –

अवनीत कौरचा हा व्हिडीओ जुना आहे की आताचा, याबद्दल अद्याप काही माहिती आलेली नाही. या व्हिडीओत अवनीत खूश दिसतेय. तिच्याबरोबरच मुनव्वर व शहनाज व इतर सर्वजण आनंदाने विराटचं नाव घेत त्याला चिअर करत आहेत. विराटच्या निवृत्तीनंतर हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे.

विराट कोहलीची निवृत्ती

विराटने निवृत्तीच्या पोस्टमध्ये लिहिलं, “टीम इंडियाची कसोटी कॅप परिधान करून मला १४ वर्ष झाली. खरं सांगू तर, हा प्रवास मला कुठे नेईल, याची मला काहीच कल्पना नव्हती. या प्रारुपाने माझी परीक्षा पाहिली, मला घडवलं आणि आयुष्यभरासाठी शिदोरी दिली. टीम इंडियासाठी कसोटी खेळणं हे माझ्यासाठी नेहमीच खास होतं. या फॉरमॅटपासून दूर जाण्याचा निर्णय मुळीच सोपा नव्हता, पण योग्य वाटतो. मी या खेळासाठी सर्वकाही दिलं. त्याहून अधिक या खेळाने मला परत दिलं. कृतज्ञ भावनेने भरलेल्या हृदयानं मी कसोटीचा प्रवास थांबवतोय.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनुष्काची विराटसाठी खास पोस्ट

“तुझे असंख्य रेकॉर्ड्स आणि कारकिर्दीतील माइलस्टोन याविषयी सगळेजण बोलतीलच. पण, तू कधीही न दाखवलेले अश्रू, खेळाच्या या फॉरमॅटसाठी तुझ्या मनात असलेलं अढळ प्रेम या सगळ्या गोष्टी मला काय आठवत राहतील. प्रत्येक कसोटी मालिकेनंतर तुझ्यात बदल होत गेला… तू थोडा शांत झालास, आणखी नम्र झालास आणि तुला या सगळ्या टप्प्यातून विकसित होताना पाहणं हे माझं भाग्य आहे. मी नेहमी अशीच कल्पना केली होती की, तू कसोटी सामन्यादरम्यान निवृत्त होशील. पण, तू नेहमीच तुझ्या मनाचं ऐकलं आहेस आणि म्हणूनच ‘माय लव्ह’ मी एवढंच सांगेन की, तू खेळाच्या या फॉरमॅटमध्ये आज सर्व काही मिळवलं आहेस,” असं अनुष्काने विराटसाठी केलेल्या खास पोस्टमध्ये लिहिलं.