नाना पाटेकर यांची मुख्य भूमिका असलेला ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट शुक्रवारी (२८ सप्टेंबर रोजी) सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाचं दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केलं आहे. ‘द काश्मीर फाइल्स’सारखा सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर विवेक अग्निहोत्रींच्या ‘द व्हॅक्सिन वॉर’कडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

परंतु पहिल्याच दिवशी या चित्रपटाने निराशाजनक कामगिरी केली. सॅकनिल्कच्या रीपोर्टनुसार पहिल्या दिवशी या चित्रपटाने ८० लाखाच्या जवळपास व्यवसाय केला अन् दुसऱ्या दिवशीही याच्या कमाईत फारशी सुधारणा बघायला मिळालेली नाही. एकूणच या चित्रपटासाठी देशभरातील चित्रपटगृहांत केवळ ११.७७% इतकंच बुकिंग झाल्याचंही स्पष्ट झालं आहे.

आणखी वाचा : “द व्हॅक्सिन वॉरने ‘गदर २’ व ‘जवान’चे रेकॉर्ड…” प्रसिद्ध अभिनेत्याचा विवेक अग्निहोत्रींना टोमणा

विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’शी तुलना करायची झाली तर हा आकडा फारच निराशाजनक आहे. दुसऱ्या दिवशीही या चित्रपटाने पहिल्या दिवसाप्रमाणेच ८० लाखाहून थोडी जास्त कमाई केल्याचं स्पष्ट झालं आहे. दोन्ही दिवसांचे आकडे मिळून ‘द व्हॅक्सिन वॉर’ने आत्तापर्यंत फक्त १.७० कोटींची कमाई केल्याचं सांगितलं जात आहे.

आणखी वाचा : The Vaccine War Review: सत्ताधाऱ्यांचं कोडकौतुक, मीडियावर फोडलेलं खापर; विवेक अग्निहोत्रींचा ‘द व्हॅक्सिन वॉर’ कुठे कमी पडला? जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अद्याप या कमाईबद्दल निर्माते किंवा दिग्दर्शक यांच्याकडून पुष्टी व्हायची आहे. विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द व्हॅक्सिन वॉर’मध्ये नाना पाटेकर, पल्लवी जोशी, गिरिजा ओक, रायमा सेन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाबरोबरच पुलकित सम्राट, रिचा अन् पंकज त्रिपाठी यांचा ‘फुकरे ३’ आणि कंगनाचा दाक्षिणात्य भाषेतील पहिला चित्रपट ‘चंद्रमुखी २’सुद्धा प्रदर्शित झाला आहे.