ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी नुकतंच ‘गदर २’ व ‘द काश्मीर फाइल्स’सारख्या चित्रपटांबाबत भाष्य केलं. ‘गदर २’ व ‘द काश्मीर फाइल्स’सारखे चित्रपट हिट होत आहेत, ही चिंतेची बाब असल्याचं नसीरुद्दीन शाह म्हणाले होते. त्यांच्या या विधानावर आता ‘द काश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“त्यांना वाटत असेल की मी खूप…”, ‘वेलकम टू द जंगल’चा भाग नसण्याबद्दल स्पष्टच बोलले नाना पाटेकर

‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत विवेक अग्निहोत्री म्हणाले, “मी नसीर साहेबांचा खूप मोठा प्रशंसक आहे, म्हणूनच मी त्यांना ताश्कंद फाईल्समध्ये कास्ट केले होते. पण आता ते ज्या पद्धतीच्या गोष्टी बोलत आहेत, त्यावरून असं वाटतंय की ते कदाचित खूप म्हातारे झाले आहेत किंवा ते आयुष्यात खूप निराश आहेत. कधीकधी, लोक बर्‍याच गोष्टींमुळे निराश होतात किंवा कदाचित त्यांना असं वाटतंय की काश्मीर फाइल्सच्या सत्यामुळे त्यांच्याबद्दल काहीतरी उघड होत आहे. इतर कोणाच्या तरी कलेतून लोकांसमोर नग्न होणे लोकांना सहसा आवडत नाही. काहीतरी गडबड आहे, ते जे बोलतायत त्यावरून काहीतरी बरोबर नाही असं दिसून येतंय.”

“मला नग्न केलं होतं,” मराठमोळ्या सोशल मीडिया स्टारचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, “मला खूप तुच्छतेने…”

विवेक अग्निहोत्री पुढे म्हणाले, “मला असं म्हणायचं आहे की ते नरसंहाराचे समर्थन करणारे चित्रपट करण्यात आनंदी आहे, त्यांनी नरसंहाराचे समर्थन करणाऱ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे, कदाचित ते त्यांच्या धर्मामुळे किंवा त्यांच्या निराशेमुळे असेल. कोणत्यातरी कारणामुळे कदाचित त्यांना दहशतवाद्यांचे समर्थन करणे आवडते, मला नाही. नसीर काय म्हणतात, याची मला पर्वा नाही कारण माझ्याकडे दहशतवादाबद्दल शून्य सहनशीलता आहे. कदाचित ते दहशतवाद्यांवर प्रेम करत असतील पण मला त्याची पर्वा नाही.”

“पुढच्या पिढीला…” ‘गदर २’ व ‘द काश्मीर फाइल्स’सारख्या चित्रपटांविषयी नसीरुद्दीन शाह यांनी व्यक्त केली नाराजी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय म्हणाले होते नसीरुद्दीन शाह?

“मी ‘द केरला स्टोरी’ किंवा ‘गदर २’सारखे चित्रपट पाहिलेले नाहीत. पण त्यात नेमकं काय दाखवलं जात आहे ते मला चांगलंच ठाऊक आहे. ही फार चिंताजनक बाब आहे की ‘द काश्मीर फाइल्स’सारखे चित्रपट हिट होत आहेत, पण सुधीर मिश्रा, अनुभव सिन्हा, हंसल मेहता यांचे चित्रपट प्रेक्षक पाहत नाहीत. त्यामुळे या दिग्दर्शकांनी या गोष्टींमुळे न डगमगता त्यांचे चित्रपट लोकांसमोर आणायला पाहिजेत असं मला वाटतं,” असं नसीरुद्दीन शाह म्हणाले होते.