बॉलीवूडचे बहुतांश कलाकार एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. सारा अली खान – जान्हवी कपूर, अर्जुन कपूर – रणवीर सिंह, शाहरुख खान – काजोल यांसारख्या अनेक सेलिब्रिटींची एकमेकांबरोबर गेल्या अनेक वर्षांपासून घट्ट मैत्री आहे. याबाबत अभिनेता विवेक ओबेरॉयने नुकत्याच मिर्ची प्लसला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. करिअरमधील पडत्या काळात खिलाडी कुमार मदतीला धावून आल्याचं अभिनेत्याने सांगितलं.

विवेक ओबेरॉय म्हणाला, “बॉलीवूडमध्ये एका विशिष्ट वर्गाकडून माझ्यावर बहिष्कार घालण्यात आला होता. माझ्या करिअरची संपूर्णपणे वाट लागली होती. अशातच मला अक्षय कुमारने फोन केला. तेव्हा मी त्याला संपूर्ण परिस्थिती सांगितली. मी प्रचंड मानसिक तणावात असताना तो अवघ्या अर्ध्या तासात माझ्या घरी आला. एवढ्या लगेच अक्षय माझ्या मदतीकरता आल्याने मला सुद्धा आश्चर्य वाटलं होतं. या प्रकरणी स्वत: लक्ष घालून त्याने माझी समजूत काढली आणि मला विविध उपाय सुचवले. त्या क्षणाला माझं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं.”

हेही वाचा : हिरवा चुडा, जांभळ्या रंगाचा लेहेंगा अन्…; पूजा सावंतला लागली सिद्धेशच्या नावाची हळद, लेकीसाठी आईची लगबग सुरू…

विवेक पुढे म्हणाला, “माझ्या घरी आल्यावर त्याने धीराने माझं सगळं म्हणणं ऐकून घेतलं आणि अक्षय मला म्हणाला, ‘बघ सध्या माझ्याकडे अनेक शो आहेत परंतु, व्यग्र वेळापत्रकामुळे मी हे शो करू शकत नाही. माझ्याकडे कामासाठी ज्या ऑफर येतील त्या सगळ्यांना मी तुझं नाव सांगेन. तू नक्की त्या कामांचा विचार कर.’ खरंतर आजच्या काळात एवढं कोणीच कोणासाठी करत नाही. “

हेही वाचा : पती डॉक्टर, तर माधुरी दीक्षितच्या सासऱ्यांचं शिक्षण किती? म्हणाले, “१९६३ ला इंग्लंडला गेलो अन्…”

“माझे अनेक चित्रपट त्याकाळी हिट ठरले. मला पुरस्कार मिळाले पण, एवढं असूनही मला काम मिळत नव्हतं. याचा मला प्रचंड मानसिक त्रास होत होता. माझ्यावर अशाप्रकारे बहिष्कार घालण्याचा काय हेतू होता? अक्षयने घरी आल्यावर आपण त्या लोकांशी भांडूया, मी तुझ्या पाठिशी आहे असे खोटे सल्ले न देता व्यावहारिकपणे गोष्टी सोडवल्या. यामुळे मला समाधान, पैसा आणि एक अभिनेता म्हणून प्रेक्षकांचं प्रेम मिळालं.” असं विवेक ओबेरॉयने सांगितलं.

हेही वाचा : अखेर मानसी नाईक पतीपासून विभक्त! घटस्फोट होताच व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “आता…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, विवेक ओबेरॉयने रोहित शेट्टी दिग्दर्शित इंडियन पोलीस फोर्स या सीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे. यामध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा, शिल्पा शेट्टी, श्वेता तिवारी अशा दिग्गज कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे.