एमएक्स प्लेअरच्या ‘धारावी बँक’ या वेबसीरिजमधून बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय पुन्हा चर्चेत आला आहे. मधली काही वर्षं बॉलिवूडपासून दूर फेकल्या गेलेल्या विवेकने पुन्हा चित्रपटसृष्टीत जम बसवायला सुरुवात केली आहे. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये विवेकने त्याच्या एकंदर बॉलिवूडमधील प्रवासाबद्दल खुलासा केला आहे. शिवाय बॉलिवूडमधल्या मोठ्या लोकांनी विवेकचं करिअर उद्ध्वस्त करायचादेखील प्रयत्न केला होता त्याबद्दल वक्तव्य केलं आहे.

याबरोबरच विवेकने बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान स्वतः निर्माण केलं असल्याचंही स्पष्ट केलं आहे. ‘साथीया’, ‘कंपनी’सारखे लागोपाठ हीट चित्रपट देणाऱ्या विवेक ओबेरॉयला बॉलिवूडमधून बरंच लांब फेकण्यात आलं होतं. ऐश्वर्या रायशी त्याची जवळीक आणि तेव्हाच्या ऐश्वर्याच्या एक्स बॉयफ्रेंड आणि सुपरस्टार सलमान खानशी त्याची झालेली वादावादी हे प्रकरण तेव्हा चांगलंच चर्चेत आलं आणि त्यानंतर विवेकच्या करिअरला उतरती कळा लागली. मग थेट ‘शूटआऊट अॅट लोखंडवाला’मधून विवेकने पुन्हा कमबॅक केलं.

आणखी वाचा : “त्यांनी माझं करिअर उद्ध्वस्त…” बॉलिवूडमधील कंपूशाहीबद्दल विवेक ओबेरॉयने केलं मोठं विधान

या प्रवासाबद्दल बोलताना आणि खासकरून फिल्मी कुटुंबातून पुढे आलेल्या विवेकने याविषयी फार महत्त्वाची गोष्ट शेअर केली. बॉलिवूडमध्ये नेपोटीजम आहे पण त्याचा वापर त्याने कधीच केला नाही असं विवेक सांगतो. विवेक म्हणतो, “माझ्या कुटुंबातील मी दुसऱ्या पिढीचा अभिनेता आहे. माझ्या वडिलांनी मला लॉंच करावं याच्या मी विरोधात होतो. मी माझ्या हिंमतीवर आणि प्रचंड मेहनत घेऊन इथवर पोचलो आहे. माझा एखाद्याच्या योग्यतेवर प्रचंड विश्वास आहे. उद्या जर माझ्या मुलाला नट व्हायचं असेल तर मी त्याच्यासाठी चित्रपट काढणार नाही. त्यांना त्यांची धडपड करावी लागेल. त्यांच्यात खरंच क्षमता असेल तर ते नक्कीच यात यशस्वी होतील.”

View this post on Instagram

A post shared by Amazon MX Player (@mxplayer)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या मुलाखतीमध्ये विवेकने त्याच्य दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनुभवाबद्दही खुलासा केला शिवाय ओटीटी ही त्याच्यासाठी सुवर्णसंधी आहे असंही विवेक या मुलाखतीमध्ये म्हणाला. विवेकच्या ‘धारावी बँक’ या सीरिजमधील भूमिकेचं लोकांनी खूप कौतुक केलं आहे. यात विवेकबरोबरच सुनील शेट्टीदेखील मुख्य भूमिकेत आहे.