बॉलिवूड कलाकरांचं लव्ह लाइफ बी-टाऊनमध्ये नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतं. बॉलिवूडमधील अनेक टॉपच्या अभिनेत्री त्यांच्या खासगी आयुष्यामुळे बऱ्याच चर्चेत आल्या. त्यातीलच एक दिवंगत अभिनेत्री म्हणजे श्रीदेवी. श्रीदेवी यांच्या कामाचे आजही लाखो चाहते आहेत. पण कामाबरोबरच त्यांचं खासगी आयुष्य सगळ्यांपासून कधीच लपून राहिलेलं नाही. २ जून १९९६मध्ये बोनी कपूर यांच्याशी त्यांनी लग्नगाठ बांधली. पण बोनी कपूर यांच्याबरोबर लग्न करण्यापूर्वी त्यांचं काही अभिनेत्यांशी नाव जोडलं गेलं.

कलाकारांच्या अफेअरच्या चर्चा बी-टाऊनला काही नव्या नाहीत. असंच काहीसं श्रीदेवी यांच्याबाबतीतही घडताना दिसलं. मिथुन चक्रवर्ती व श्रीदेवी यांच्या नात्याच्याही त्यावेळी बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. ‘एबीपी न्यूज’च्या वृत्तानुसार, त्यावेळी काही मीडिया रिपोर्ट्समध्ये मिथुन चक्रवर्ती व श्रीदेवी यांनी मंदिरात लग्न केलं असल्याचं म्हटलं होतं. दोघं एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. पण त्यावेळी मिथुन आधीच विवाहित होते.

आणखी वाचा – घरीच २५ लोकांमध्ये विवाह उरकला, लग्नानंतरही चार ते पाच वेळाच नवऱ्याला भेटली अन्…; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा अजब खुलासा

मिथून यांना श्रीदेवी यांच्याशी लग्न करायचं होतं. मात्र त्यांच्या पत्नी योगिता यांनाही या दोघांच्या नात्याबाबत समजलं होतं. त्यानंतर मिथून व श्रीदेवी यांनी एकमेकांशी बोलणं टाळलं. त्यानंतर या नात्याचा शेवट झाला. त्याचबरोबरीने अभिनेते जितेंद्र यांच्याशीही श्रीदेवी यांचं नावं जोडण्यात आलं. या दोघांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र कामही केलं होतं. याचदरम्यान या दोघांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा रंगल्या.

आणखी वाचा – “तेव्हा तिला दोन वेळेचं जेवण तुम्ही देत होता का?”, अमोल कोल्हेंचा गौतमी पाटीलला पाठिंबा, म्हणाले, “ती अजूनही लहान आणि…”

View this post on Instagram

A post shared by Boney.kapoor (@boney.kapoor)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यावेळी जितेंद्रही विवाहित होते. जितेंद्र यांच्या पत्नी शोभा यांनाही श्रीदेवी व त्यांच्या अफेअरच्या चर्चांबाबत समजलं होतं. मात्र जितेंद्र श्रीदेवी यांना घरी घेऊन गेले आणि शोभा यांचा गैरसमज दूर केला. विशेष म्हणजे मिथून यांच्यावर आपलं किती प्रेम आहे हे दाखवण्यासाठी श्रीदेवी यांनी बोनी कपूर यांना राखी बांधली होती. मात्र मिथून यांच्यापासून दूर झाल्यानंतर श्रीदेवी व बोनी कपूर यांच्यामध्ये जवळीक वाढली. त्यानंतर बोनी कपूर यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट देत श्रीदेवी यांच्याशी लग्न केलं.