जगभरातील अत्यंत प्रतिष्ठित ‘मेट गाला’ फॅशन शो नुकताच न्यू यॉर्कमध्ये पार पडला. या कार्यक्रमात बॉलीवूडपासून हॉलीवूडपर्यंत अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. याआधी भारतीय अभिनेत्री ऐश्वर्या राय, दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा यांनी हजेरी लावली होती. मात्र, यंदा ‘मेट गाला’मध्ये चर्चेचा विषय ठरली ती बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट. आलिया भटने ‘मेट गाला’च्या रेड कार्पेटवर पदार्पण केलं. मात्र, रेड कार्पेटवर येताच पापाराझींकडून आलियाचे नाव घेण्यात मोठी चूक झाली. आलियाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा- Video : नाटू नाटू’ गाण्यावर नीतू कपूर यांचा भन्नाट डान्स; ‘पद्मिनी कोल्हापुरेंसह ठरला ठेका

व्हिडीओमध्ये आलिया रेड कार्पेटवर फोटोग्राफर्ससाठी पोझ देत होती. डिझायनर प्रबल गुरुंगसोबत जेव्हा ती समोर येते, तेव्हा काही पापाराझी तिला ऐश्वर्या म्हणून हाक मारताना दिसतात. हे ऐकल्यानंतरही आलिया तिच्या चेहऱ्यावर हास्य ठेवत फोटोसाठी पोझ देताना दिसत आहे.

या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. काहींना ऐश्वर्याबाबत घडलेल्या घटनेचीही आठवणही करून दिली. ‘मेट गाला’मध्ये एकदा ऐश्वर्यालाही कतरिना कैफ अशी हाक मारण्यात आली होती. त्यामुळे आलिया भट्टबाबत झालेली ही घटना काही नवीन नाही, असं नेटकऱ्यांनी म्हटलंय. तर एका यूजरने ‘मेट गाला’मध्ये आलिया भटला पाठण्याऐवजी, दीपिका, कंगना, ऐश्वर्या किंवा सोनम कपूरला पाठवायला हवं होतं, अशी कमेन्ट केली आहे.

हेही वाचा- सलमानवर कोसळला दु:खाचा डोंगर; जवळच्या व्यक्तीच्या निधनाने मोठा धक्का, पोस्ट शेअर करत म्हणाला, “माझी प्रिय अद्दू…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘मेट गाला’मधील आलियाचा ड्रेस हा तब्बल एक लाख मोत्यांनी डिझाइन करण्यात आला होता. सुपरमॉडेल क्लॉडिया शिफरच्या १९९२ मधील चॅनल ब्रायडल लूकवरून प्रेरणा घेत हा ड्रेस डिझाइन करण्यात आला होता. न्यू यॉर्कमधील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट कॉस्च्युम इन्स्टिट्यूट या संस्थेकडून हा फॅशन शो आयोजित केला जातो. या फॅशन शोमधून उभारलेला निधी हा कॉस्च्युम इन्स्टिट्यूटला दान करण्यात येतो.