Baba Siddique Ended Shah Rukh Khan Salman Khan Fight: राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला आहे. त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. गोळीबारात जखमी झालेल्या बाबा सिद्दीकी यांना लीलावती रुग्णालयात नेण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. बाबा सिद्दीकी यांच्या निधनाबद्दल कळताच संजय दत्त, सोनाक्षी सिन्हाचे सासरे इक्बाल रतनसी रुग्णालयात पोहोचले आहे.

बॉलीवूडमध्ये बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीची दरवर्षी खूप चर्चा असते. बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीला केवळ बॉलीवूडच नाही तर छोट्या पडद्यावरील स्टार्सही हजेरी लावतात. बाबा सिद्दीकी यांनी बॉलीवूडमधील दोन सुपरस्टार्सचे शत्रुत्व संपवले होते. होय. सलमान खान व शाहरुख खान बरीच वर्षे एकमेकांशी बोलत नव्हते, त्यांच्यातील सगळे वाद बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीतच संपले होते.

हेही वाचा – मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारात मृत्यू

२००८ मध्ये कतरिना कैफच्या वाढदिवसाच्या पार्टीत सलमान खान व शाहरुख खान यांच्यात कडाक्याचं भांडण झालं होतं. त्यानंतर पाच वर्षे ते एकमेकांशी बोलले नव्हते. इतकंच नाही तर एकमेकांबद्दल बोलणंही टाळायचे. या दोघांचा अबोला दूर करण्यात बाबा सिद्दीकी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनीच या दोन्ही स्टार्सना २०१३ मध्ये एका कार्यक्रमात एकत्र आणलं होतं. २०१३ मध्ये बाबा सिद्दीकी यांनी त्यांच्या घरी इफ्तार पार्टी आयोजित केली होती. सलमान खान आणि शाहरुख खान यांना या पार्टीसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. दोघेही या इफ्तार पार्टीत सहभागी झाले होते. याच ठिकाणी त्या दोघांनी अनेक वर्षांची नाराजी संपवून मैत्रीचा हात पुढे केला होता. दोघांनी एकमेकांना मिठी मारून त्यांच्यातील वाद आणि मतभेद संपवले होते. सलमान व शाहरुख यांच्यातील वाद मिटवण्यात बाबा सिद्दीकी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

हेही वाचा – Baba Siddique Shot Dead: बाबा सिद्दिकींची गोळ्या झाडून हत्या, हरियाणा-यूपी कनेक्शनचा संशय; दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात!

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बाबा सिद्दीकी यांच्या निधनाची बातमी येताच त्या इफ्तार पार्टीमधील त्यांचे फोटो पुन्हा एकदा व्हायरल होत आहेत. यात बाबा सिद्धीकी सलमान खान व शाहरुख खानबरोबर दिसत आहेत.