अभिनेता धर्मेंद्र बॉलिवूडमध्ये ‘हीमॅन’ म्हणूनही ओळखले जातात. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. धर्मेंद्र यांनी आपल्या करिअरच्या काळात ३०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. चित्रपटांव्यतरिक्त धर्मेंद्र यांचे व्यक्तिक आयुष्यही खूप चर्चेत होते. एवढंच नाही तर त्यांच्या दारु पिण्याच्या सवयीमुळेही अनेकदा ते संकटात सापडले आहेत. काही वर्षांपूर्वी दारुच्या याच सवयीमुळे त्यांच्या हातून मोठी चूक घडली होती. या चूकीचा पश्चाताप धर्मेंद्र यांना आजही होतो. काय होती ती चकू?

हेही वाचा- “ईशा, अहाना, हेमा मी तुमच्याशी बोलू शकलो असतो, पण…”, नातवाच्या लग्नानंतर धर्मेंद्र यांची ‘ती’ पोस्ट चर्चेत

एका मुलाखतीदरम्यान स्वतः धर्मेंद्र यांनी ती घटना सांगितली आहे धर्मेंद्र म्हणाले. “मी एकदा घरी खूप दारु पिऊन आलो होतो. पण जाण्याअगोदर मी आमच्या नोकराला सांगितले होते की, जेव्हा मी रात्री घरी येईन तेव्हा गुपचूप दरवाजा उघड. मी घरी आलो आणि दाराची बेल वाजवली. मात्र, नोकराने लवकर दरवाजा उघडला नाही. खूप वाट बघितल्यानंतर जेव्हा दरवाजा उघडला गेला तेव्हा घरात अंधार होता. मला खूप राग आलेला. नोकरानेच दरवाजा उघडला असं समजून मी त्याची कॉलर पकडली आणि त्याला खूप काही बोललो.

हेही वाचा- ‘लस्ट स्टोरी २’ बघताना खोलीत अचानक कुणी आले तर काय करायचं? तमन्ना भाटियाने दिलं उत्तर, म्हणाली….

धर्मेंद्र पुढे म्हणाले, “समोरच्या व्यक्तीनेही कॉलर धरलेला माझा हात झटकला आणि मला आज्जीच्या खोलीत घेऊन गेले. तिथे गेल्यावर मला कळालं की दरवाजा उघडणारा नोकर नसून माझे वडील होते. त्या प्रकारानंतर मला खूप लाज वाटली. मी माझ्या वडिलांची खूप माफीही मागितली. अजूनही माला त्या प्रकाराची लाज वाटते.”

हेही वाचा- महेश भट्ट यांच्याशी लग्न करण्याचा आलिया भट्टच्या आईला होता पश्चाताप, सावत्र लेक पूजाचा मोठा खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धर्मेंद्र यांचा नातू आणि सनी देओलचा मुलगा करण देओलचं नुकतचं लग्न झालं. करणने त्याची प्रेयसी दिशा आचार्यबरोबर लग्नगाठ बांधली. या लग्नाता बॉबी देओल, त्याची पत्नी तान्या व मुलगा आर्यमान यांच्यासह धर्मेंद्र व त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौरही उपस्थित होत्या. मात्र, धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नी हेमा मालिनी व त्यांच्या मुली ईशा व अहाना लग्नात गैरहजेर होत्या. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते.