बॉलीवूड चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान बरेच किस्से घडत असतात. काही किस्से कलाकार स्वतः शेअर करतात, तर काही सेटवरील क्रू मेंबर्स व इतरांकडूनही पसरतात. बॉलीवूडच्या सुपरहिट चित्रपटाचा असाच एक किस्सा आहे. या चित्रपटात अनिल कपूर व डिंपल कपाडिया मुख्य भूमिकेत होते. एका रोमँटिक सीनच्या शूटिंगवेळी अनिल यांनी शर्ट काढल्यावर डिंपल चिडल्या होत्या.

१९८६ मध्ये आलेल्या ‘जांबाज’ चित्रपटात दिग्दर्शक फिरोज खान यांनी अनिल कपूरना मुख्य भूमिकेत घेतलं होतं. त्यांच्याबरोबर डिंपल कपाडिया होत्या. डिंपलने अनिल यांच्या गर्लफ्रेंडची भूमिका केली होती. दोघांच्या जोडीला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि चित्रपट हिट ठरला. पण या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान काहीतरी घडलं होतं. होय. या सिनेमात एक रोमँटिक सीन होता. हा सीन फिरोज खान यांच्या फार्महाऊसच्या तबेल्यात शूट करायचा होता. दोन्ही स्टार्स या सीनसाठी तयारी करून शूटिंगच्या ठिकाणी पोहोचले.

अनिल कपूरवर भडकल्या होत्या डिंपल कपाडिया

हा सीन शूट करण्यासाठी अनिल कपूर यांनी सेटवर शर्ट काढला तेव्हा सेटवरील वातावरण अचानक बदललं. अनिल कपूर यांना शर्टलेस पाहून डिंपल कपाडियाने हा सीन शूट करण्यास स्पष्ट नकार दिला होता. अनिल कपूर यांच्या छातीवरील केस पाहून डिंपल संतापल्या होत्या, असं म्हटलं जातं.

डिंपल यांनी शूटिंग करायला नकार दिला होता, पण नंतर दिग्दर्शकाने त्यांची मनधरणी केली. दिग्दर्शकाने खूप समजावल्यावर त्या हा बोल्ड सीन करायला तयार झाल्या. या सीन शूट केल्यानंतर केसांवरून डिंपल बराच काळ अनिल कपूर यांना चिडवत होत्या, असं म्हणतात.

सनी देओलमुळे डिंपल नाराज झाल्याच्याही चर्चा

काही रिपोर्ट्स या प्रसंगाबाबत वेगळा दावाही करतात. सनी देओलमुळे डिंपल अनिलवर नाराज झाल्या होत्या, असंही म्हणतात. डिंपल व सनी यांच्यात जवळीक होती. दुसरीकडे, अनिल व सनी यांच्यात सगळं आलबेल नव्हतं, त्यामुळे डिंपल यांना अनिलबरोबर रोमँटिक सीन करायचा नव्हता, असं म्हटलं जातं.