परेश रावल हे भारतीय चित्रपटसृष्टीतील अत्यंत ताकदीचे अभिनेते आहेत. जवळपास सगळ्याच धाटणीच्या भूमिकांमधून त्यांनी कायम प्रेक्षकांना काहीतरी वेगळं द्यायचा प्रयत्न केला आहे. परेश रावल यांच्या ‘सरदार’. ‘सर’, ‘दौड’पासून ‘हेरा फेरी’, ‘ओह माय गॉड’पर्यंत कित्येक भूमिकांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. नुकतंच एका मुलाखतीमध्ये परेश यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही खुलासे केले आहेत.

युट्यूबवरील ‘नीलेश मिश्रा स्लो इंटरव्ह्यु’ या कार्यक्रमात परेश यांनी हजेरी लावली. या मुलाखतीदरम्यान चित्रपटाबरोबरच त्यांनी त्यांच्या खासगी आयुष्यातील काही गोष्टींचा खुलासा केला. आपलं कुटुंब आणि आपली आई यांच्याविषयी परेश भरभरून बोलले. इतकंच नव्हे तर त्याची आई रुग्णालयात कोमामध्ये असताना डॉक्टरांनी त्यांना दिलेल्या सल्ल्याबद्दलही परेश यांनी सांगितलं आहे.

आणखी वाचा : “मी ५७ वर्षांचा आहे पण…” शाहरुख खानने मुलाखतीदरम्यान व्यक्त केली मनातील खदखद

याविषयी बोलताना परेश म्हणाले, “माझी आईचा जेव्हा अपघात झाला तेव्हा ती १२ दिवस कोमात होती. जे डॉक्टर तिच्यावर उपचार करत होते ते माझे चांगले मित्र होते. पुढे काय करायचं याविषयी मी त्यांच्याकडे विचारणा केली. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की, तुमची आई लाईफ सपोर्टवर आहे, ती शुद्धित जरी आली तरी ती कुणालाच ओळखू शकणार नाही. त्यांचं वय जास्त आहे, या वयात त्या एवढी मोठी शस्त्रक्रिया सहन करू शकणार नाहीत, त्याच्या मेंदूला जबर दुखापत झाली आहे. तुम्ही असं थांबून केवळ त्यांचा मृत्यू पुढे ढकलत आहात, लाईफ सपोर्ट काढायचा निर्णय लवकरात लवकर घ्या, हेच सत्य आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबद्दल परेश रावल पुढे म्हणाले की माझ्या आईच्या आयुष्याच्या शेवटाबद्दल निर्णय घेणारा मी कुणीच नाहीये. अखेर त्यांच्या आईचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. तेव्हा परेश रावल हे श्रीलंकेत चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होते. परेश रावल हे आता अनंत महादेवन यांच्या ‘द स्टोरीटेलर’ या चित्रपटात झळकणार आहेत. शिवाय त्यांच्या ‘हेरा फेरी ३’चीसुद्धा चांगलीच चर्चा आहे.