दिलजीत दोसांझने पंजाबीबरोबरच हिंदी सिनेमांमध्ये काम करून प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. तो उत्तम अभिनेता व अप्रतिम गायक आहे. अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सोहळ्यात परफॉर्म केल्यापासून दिलजीत खूप चर्चेत आहे. नंतर त्याने जगप्रसिद्ध गायक एड शीरनबरोबर परफॉर्मन्स दिला, यावेळी एड शीरनने त्याच्याबरोबर पंजाबी गाणं गायलं. लवकरच तो ‘अमर सिंह चमकीला’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  

दिलजीत दोसांझच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल सर्वांनाच माहित आहे, पण तो आपलं वैयक्तिक आयुष्य खूप खासगी ठेवतो. या ४० वर्षीय अभिनेत्याबद्दल एकदा कियारा अडवाणीने खुलासा केला होता. तिने केलेल्या विधानाची पुन्हा एकदा चर्चा होत आहे. कियारा व दिलजीतने ‘गुड न्यूज’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. यातील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान कियाराने दिलजीतबद्दल एक खुलासा केला होता.

श्वेता बच्चन अन् कपूर कुटुंबाचं आहे खास नातं, अमिताभ बच्चन यांचे जावई निखिल नंदा व रणबीर कपूर एकमेकांचे…

कियारा अडवाणीने या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सांगितले होतं की चित्रपटातील मुख्य कलाकार करीना कपूर, अक्षय कुमार व दिलजीत दोसांझ यांच्यापैकी फक्त ती एकमेव आहे, जिची मुलं नाहीत. याचाच अर्थ दिलजीत बाबा आहे. “मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या, कारण सगळ्या स्टारकास्टपैकी मी एकटीच आहे जिला मुलं नाहीत,” असं ‘बॉलीवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत कियारा म्हणाली होती.

श्वेता बच्चन आई-वडिलांसह मुंबईत का राहते? पतीबरोबर न राहण्याचं कारण काय? जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिलजीतने आपल्या एका जुन्या मुलाखतीत सांगितलं होतं की तो आपल्या कुटुंबाला प्रसिद्धीझोतापासून जाणीवपूर्वक दूर ठेवतो. कारण त्याच्यामुळे त्याच्या कुटुंबाला ट्रोलिंगचा सामना करावा लागू नये, अशी त्याची इच्छा आहे. काही रिपोर्ट्सनुसार, दिलजीत विवाहित असून त्याची पत्नी आणि मुलगा दोघेही अमेरिकेत राहतात. पण दिलजीतने आजवर कधीच याबाबत सांगितलेलं नाही.