अभिनयक्षेत्रात काम करणारे कलाकार खूप फिट असतात. इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्यांना स्वतःला मेंटेन ठेवावं लागतं. वजन वाढणार नाही, याची काळजी घ्यावी लागते. पण बऱ्याचदा काहींचं वजन वाढतं, त्यानंतर त्यांना ट्रोलिंगला सामोरं जावं लागतं. इतकंच नाही तर अनेकदा त्यांना प्रोजेक्ट्सही गमवावे लागतात. अभिनेता रोहित रॉयनेही त्याचा असाच एक अनुभव सांगितला आहे. सलमानने त्याला एकदा लठ्ठ गाय म्हटलं होतं.

“मी राहुल गांधींची भूमिका करतोय तर…”, सुबोध भावेचे वक्तव्य; म्हणाला, “मी कुठल्या भूमिका…”

रोहितने खुलासा केला त्याच्या करिअरमध्ये एक वेळ अशी आली, जेव्हा त्याला चांगल्या भूमिका मिळत नव्हत्या. तो त्याच्या टेलिव्हिजनवरील कामामुळेही निराश होता. “जेव्हा मी अभिनेता होण्याचा विचार करत होतो, तेव्हा त्यांनी (सलमान खानने) मला सांगितलं की तू ६० च्या दशकातील हॉलीवूड अभिनेत्यासारखा दिसतोस, तू तसाच पेहराव केला पाहिजेस,” असं रोहित म्हणाला. सलमान खान रोहितच्या लूकची तुलना हॉलीवूड अभिनेता रॉक हॅडसनशी करायचा.

“मी स्वार्थी होतो”, डिंपल कपाडिया वेगळ्या राहू लागल्यावर राजेश खन्नांनी केलेलं वक्तव्य; म्हणालेले, “ती दिवस-रात्र…”

रोहितने पुढे सांगितलं की, अहमदाबादमधील सेलिब्रिटी क्रिकेट लीगमध्ये तो सलमान खानला भेटला होता आणि त्याच्याशी संवाद साधला होता. तो म्हणाला, “माझे वजन खूप वाढले होते, मी निराश होत होतो कारण मला हव्या तशा गोष्टी होत नव्हत्या. मी खूश नाही, असं मी सलमानला सांगितलं. मी सर्वतोपरी प्रयत्न करतोय पण काही घडत नाहीये आणि तो माझ्याकडे बघून म्हणाला तू तर लठ्ठ गाईसारखा दिसत आहेस, मी तुला काही काम देणार नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“त्यावेळी मी ४५-४६ वर्षांचा होतो आणि मी ठरवलं की ५० वर्षे पूर्ण होण्यापूर्वी मला तंदुरुस्त व्हायचं आहे आणि तसंच झालं,” असं रोहितने सांगितलं. सलमानच्या त्या विधानानंतर रोहितने खूप मेहनत घेतली आणि वाढलेलं वजन कमी करून तो फिट झाला.