बॉलीवूडमध्ये शाहरुख आणि गौरी खान यांच्याकडे आदर्श जोडी म्हणून पाहिले जाते. आयुष्यातील कठीण काळात गौरीने कायम मदत केल्याचे शाहरुखने अनेकदा सांगितले आहे. अलीकडेच व्हायरल झालेल्या एका जुन्या व्हिडिओमध्ये शाहरुखने गौरीबद्दल मजेशीर खुलासा केला आहे.

हेही वाचा : “वडिलांच्या निधनानंतरही मी रडले नव्हते, कारण…”; ‘द केरला स्टोरी’ फेम अदा शर्माने सांगितला आयुष्यातील ‘तो’ प्रसंग

शाहरुखने त्याची जवळची मैत्रीण आणि बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक फराह खानच्या शोमध्ये काही वर्षांपूर्वी गौरी त्याला कधीच गिफ्ट देत नाही याबाबत खुलासा केला होता. फराह खानच्या ‘तेरे मेरे बीच में’ या टॉक शोमधील ही जुनी क्लिप सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये शाहरुख म्हणतोय, “गौरी मला कधीच गिफ्ट देत नाही…याबद्दल विचारल्यावर की सांगते ज्या माणसाकडे सर्वकाही आहे मी सुद्धा त्याला मी काय देणार?”

हेही वाचा : हृतिक रोशनसमोर विकी कौशलने टेकले गुडघे; IIFA सोहळ्यातील ‘तो’ व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “२३ वर्षं झाली पण…”

शाहरुखने याबाबत गौरीचा एक जुना किस्सा सुद्धा शेअर केला आहे. तो सांगतो, “माझे ऑपरेशन झाल्याने आम्ही काही दिवस लंडनमध्ये राहत होतो. त्यावेळी लंडनमध्ये मी एक नवे टी-शर्ट घेतले होते पण ते मला व्यवस्थित झाले नाही म्हणून मी गौरीला टी-शर्ट बदलून आण असे सांगितले. यानंतर गौरीने मला सांगितले मी दुकानात गेले, परंतु त्यांनी मला तुझे टी-शर्ट बदलून दिले नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाहरुख पुढे म्हणाला, काही दिवसांनी काजोल आणि पॅमेला या आमच्या मैत्रिणी घरी आल्या होत्या…तेव्हा त्यांनी मला सांगितले, “गौरी खरंच टी-शर्ट बदलायला गेली होती परंतु तिने दुसरे टी-शर्ट न घेता दुसरे काहीतरी घेतले.” याबद्दल मी गौरीला विचारले तेव्हा तिने सांगितले, “तुझे ऑपरेशन झाले आहे तुला नव्या कपड्यांची काय गरज आहे? म्हणून मी मला हॅंडबॅग घेतली.” शाहरुखचा हा जुना व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. दरम्यान, ‘पठाण’नंतर शाहरुख लवकरच ‘जवान’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.