अभिनेत्री विद्या बालनने आजवर बॉलीवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. तिच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. विद्याच्या सौंदर्याचेही सगळेच जण तोंडभरून कौतुक करतात. विद्याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. लोक जेवढे तिच्या बोल्डनेसच्या प्रेमात आहेत तितकेच तिच्या पारंपरिक लूकचेही वेडे आहेत. मात्र, एकेकाळी विद्याला आपल्या शरीराचाच तिरस्कार करायची. एका मुलाखतीत विद्याने हा धक्कादायक खुलासा केला आहे.

हेही वाचा- “… म्हणून १० वर्षं एकही प्रोजेक्ट साईन केला नाही”, अभिनेत्री रेखा यांनी सांगितलं कारण

बॉलीवूड बबलला दिलेली मुलाखतीत विद्या म्हणाली की, “मी बराच काळ माझ्या शरीराशी लढा देत होते. कारण मला असे वाटत होते की, जगाला किंवा माझ्या आईला ज्या पद्धतीने अपेक्षित आहे त्यापद्धतीचे माझे शरीर नाही. मला नेहमीच या गोष्टीचा सामना करावा लागला आहे. काही काळानंतर मला समजले की मी शरीराचा गैरवापर करत आहे. मला माझ्याच शरीराचा राग येत होता. त्यामुळे मी अनेकदा आजारी पडत होते. मी अनेक वर्ष माझ्या शरीराच तिरस्कार केला. मात्र, मला खूप उशीरा समजले की जर हे शरीर नसते तर मी आज इथे नसते.”

हेही वाचा- “मी गरोदर असताना त्याने…”; करिश्मा कपूरने एक्स पती संजय कपूरवर केलेला गंभीर आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्याच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, ती लवकरच ‘नीयत’ या चित्रपटात डिटेक्टिवच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर राम कपूर, राहुल बोस, नीरज काबी, शहाना गोस्वामी, अमृता पुरी, दीपानिता शर्मा आणि निकी वालिया यांच्या प्रमुख भूमिका आहेत.