सुधीर मिश्रा दिग्दर्शित ‘हजारों ख्वाहिशें ऐसी’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता शायनी अहुजा हा बऱ्याच काळापासून रुपेरी पडद्यापासून लांब आहे. कंगना रनौतबरोबर ‘वो लम्हें’ या चित्रपटात शायनीने काम केलं आणि यातूनच त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. आज त्याचा वाढदिवस. त्यानिमित्ताने सध्या हा कलाकार काय करतो याबद्दल आपण जाणून घेऊ या.

२००९ मध्ये घरातील मोलकरणीने बलात्कारासारखा गंभीर आरोप लावल्यानंतर शायनीचं खासगी आयुष्य आणि फिल्मी करिअर उद्ध्वस्त झालं. सर्वप्रथम त्याच्या चाहत्यांचा यावर विश्वासच बसत नव्हता, पण जेव्हा न्यायालयात ही गोष्ट सिद्ध होऊन त्याला जेव्हा ७ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली तेव्हा मात्र त्याची प्रचंड बदनामी झाली. यानंतर मात्र शायनी त्याच्या चाहत्यांच्याही मनातून साफ उतरला.

आणखी वाचा : मर्डर मिस्ट्री, छोटा राजन अन् क्राइम रिपोर्टरच्या आयुष्यातील वादळ; हंसल मेहतांच्या ‘स्कूप’ वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित

मध्यंतरी मोलकरणीने खोटी साक्ष दिल्यामुळेसुद्धा हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलं होतं. २०११ मध्ये शायनीला जामिनावर सोडण्यात आलं पण नंतर तपासादरम्यान शायनी दोषी असल्याचं स्पष्ट झालं आणि त्याला ७ वर्षांचा तुरुंगवास आणि ३००० रुपये दंड ठोठावण्यात आला. सध्या शायनी या मनोरंजनसृष्टीपासून अज्ञातवासात आयुष्य घालवत आहे.

आणखी वाचा : ‘JioCinema’चा नवा ‘Premium’ प्लॅन जाहीर, प्रेक्षकांनी व्यक्त केली नाराजी; जाणून घ्या किंमत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१९९७ मध्ये शायनी अहुजाने अनुपम पांडेशी लग्नगाठ बांधली, आज त्याला एक मुलगीदेखील आहे. सध्या तो या लाइमलाइटपासून फार दूर आहे आणि एक छोटा व्यवसाय करत असल्याचं स्पष्ट झालं आहे. शायनीच्या या रेप केसवरून ‘सेक्शन ३७५’ हा चित्रपट प्रेरित असल्याचं म्हंटलं जातं. ‘वेलकम बॅक’ या चित्रपटातून शायनीने पुन्हा कमबॅक करायचा प्रयत्न केला, पण तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. शायनीने ‘गँगस्टर’, ‘लाइफ इन अ मेट्रो’, ‘भूलभुलैया’सारख्या सुपरहिट चित्रपटात काम केलं आहे.