फुटबॉलप्रेमींसाठी १८ डिसेंबर हा दिवस खूपच खास होता. एकीकडे फिफा वर्ल्ड कप २०२२ ची ट्रॉफी अर्जेंटीनाने आपल्या नावे केली तर दुसरीकडे दीपिका पदुकोणनेही भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी केली. दीपिका पदुकोणने फिफा वर्ल्ड कपच्या ट्रॉफीचं अनावारण केलं आणि असं करणारी ती पहिली ग्लोबल स्टार ठरली. ही भारतासाठी अभिमानास्पद गोष्ट होती. दीपिकाबरोबरच फिफा वर्ल्डकप ट्रॉफीच्या अनावरणासाठी स्पॅनिशचा माजी गोलकीपर इकर कॅसिलास (Iker Casillas) उपस्थित होता. पण दीपिका पदुकोणचं फुटबॉलशी दूरवर कोणतं नातं नसताना तिला फिफा वर्ल्डकप ट्रॉफीच्या अनावरणाचा बहुमान का मिळाला? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दीपिका पदुकोण आणि इकर कॅसिलास यांनी फिफा वर्ल्डकपच्या ट्रॉफीचं लुसॅल स्टेडियममध्ये अनावरण केलं. यावेळी इकर कॅसिलासने ही ट्रॉफी हातात पकडली होती. पण सोशल मीडियावर दीपिका पदुकोणच्या नावाची जोरदार चर्चा झाली. त्यातही ट्रॉफीच्या अनावरणासाठी दीपिकाची निवड का करण्यात आली? असा प्रश्न सातत्याने विचारला जातोय.

आणखी वाचा- Fifa World Cup 2022 : लिओनेल मेस्सीने विश्वचषक जिंकल्यानंतर बायको भावूक, शाहरुख खानच्या लेकीने लाइक केली पोस्ट

किती किलो वजनाची आहे ही १८ कॅरेट सोन्याची ट्रॉफी?
जवळपास ६.१७५ किलो वजनाची ही ट्रॉफी १८ कॅरेट सोन्यापासून तयार करण्यात आली आहे. या ट्रॉफीला प्रत्येक व्यक्ती स्पर्श करू शकत नाही. काही खास लोकांनाच या ट्रॉफीला स्पर्श करण्याची परवानगी असते. या खास लोकांच्या यादीत दीपिका पदुकोण आणि इकर कॅसिलासचं नावही समाविष्ट आहे.

ट्रॉफीच्या अनावरणासाठी का करण्यात आली दीपिकाची निवड?
दीपिका पदुकोणने फिफा वर्ल्डकपच्या ट्रॉफीचं अनावरण करण्याचं महत्त्वाचं कारण ब्रँड एंडॉर्समेंट हे आहे. दीपिका पदुकोण जागतिक स्तरावरील लग्जरी ब्रँड लुई विटॉनची ब्रँड अँबेसिडर आहे. याच ब्रँडने ट्रॉफी ज्या केसमध्ये ठेवण्यात आली होती. त्या केसचं डिझाइन केलं होतं तसेच ती केसही लुई विटॉन ब्रँडची होती. त्यामुळे ट्रॉफीच्या अनावरणासाठी दीपिकाची निवड करण्यात आली. दीपिका पदुकोण अनेक आंतरराष्ट्रीय लग्जरी ब्रँडची ग्लोबल फेस आहे. तसेच दोन वेळा तिच्या नावाचा टाइम मासिकातही समावेश करण्यात आला होता.

आणखी वाचा- “मी माझ्या आईबरोबर…”; अर्जेंटिना जिंकल्यानंतर शाहरुख खानने मानले मेस्सीचे आभार

दरम्यान दीपिका पदुकोणच्या कामाबद्दल बोलायचं तर आगामी काळात ती ‘पठाण’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात शाहरुख खान आणि जॉन अब्राहम यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहे. पण सध्या या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यात दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केल्याने हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. येत्या २३ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why deepika padukone chosen to unveil fifa world cup 2022 trophy here is the reason mrj
First published on: 19-12-2022 at 14:29 IST