रोमान्स किंग अशी ओळख असणारा शाहरुख खान हा सातत्याने चर्चेत आहे. शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली. या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. २५ जानेवारीला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी ५७ कोटींची कमाई केली. त्यानंतर आजवर या चित्रपटाने ६०० कोटीहून अधिक कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने इतिहास रचला आहे.

कोणत्याही मुलाखतीशिवाय केवळ ट्रेलर, गाणी आणि थेट चाहत्यांशी संवाद यांच्या माध्यमातून शाहरुख आणि ‘पठाण’ची टीमने या चित्रपटाचं प्रमोशन केलं होती. चित्रपट हीट झाल्यावरसुद्धा नुकतंच शाहरुखने सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘AskSRK’ हा हॅशटॅग पुन्हा वापरत त्याच्या चाहत्यांशी संवाद साधला. या ट्रेंडमधून शाहरुखने त्याच्या चाहत्यांना प्रश्न विचारायला सांगितले आहेत आणि त्यातील काही ठराविक लोकांच्या प्रश्नांना त्याने मजेशीर उत्तरं दिली आहेत.

आणखी वाचा : Kiara Siddharth Wedding Update: सिद्धार्थ कियाराच्या शाही लग्नसोहळ्यात दिसणार हे सेलिब्रिटीज; करण जोहरसह राम चरणही लावणार हजेरी

एका ट्विटर युझरने शाहरुखला थेट व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी डेटवर येण्यासाठी विचारलं आहे. अजूनही तरुणींमध्ये शाहरुखची क्रेझ आपल्याला दिसून येते. तर अशाच एका तरुणीने शाहरुखला ट्वीट करत विचारलं की, “लग्नासाठी मागणी घालू शकत नाही, पण या व्हॅलेंटाईन डेला माझ्याबरोबर डेटवर येणार का?”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या तरुणीला उत्तर देताना शाहरुख ट्वीट करत म्हणाला, “डेट म्हणून मी एक अत्यंत रटाळ किंवा अरसिक व्यक्ती आहे. माझ्याऐवजी एखाद्या चांगल्या मुलाला डेटवर घेऊन जा आणि चित्रपटगृहात जाऊन ‘पठाण’ बघा.” शाहरुखच्या उत्तराला बऱ्याच लोकांनी शेअर केलं आहे. पडद्यावर हिरॉईनबरोबर रोमान्स करणाऱ्या शाहरुखचं हे उत्तर ऐकून बऱ्याच तरुणींचा भ्रमनिरास झाला असेल. ‘पठाण’ बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हीट ठरला आहे. प्रेक्षकांनी हा चित्रपट अक्षरशः डोक्यावर घेतला आहे.