अभिनेत्री सारा अली खान सध्या तिच्या ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. २ जूनला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात १०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री सारा अली खानने चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत आनंद व्यक्त करत, आई अमृता सिंहबद्दल काही खुलासे केले आहेत.

हेही वाचा : “तू वेडी आहेस का?”, ‘गदर २’मधील सस्पेन्स उघड केल्यामुळे अमीषा पटेल ट्रोल; अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट पाहून नेटकरी संतापले

सारा अली खान म्हणाली, “माझा चित्रपट रिलीज झाल्यावर माझी आई मला बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या बातम्या पाठवते. माझी आई ट्विटरवर सुद्धा प्रचंड सक्रिय असते प्रत्येक अपडेट ती मला देते. मला स्वत:ला आकड्यांचे गणित कळत नाही. प्रेक्षकांकडून मिळणारे प्रेम माझ्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचे आहे.”

हेही वाचा : “अपनेवाले घर की खिडकी…”, सिद्धार्थ-मितालीच्या नव्या घराला एक वर्ष पूर्ण; अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट

अभिनेत्री पुढे म्हणाली, “बॉक्स ऑफिसवर आकड्यांचे गणित खूप महत्त्वाचे असते हे मला माहिती आहे. आतापर्यंत माझ्या ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपटाने सर्वाधिक कमाई केली आहे.” खरंतर, सारा अली खान मुख्य भूमिकेत असलेल्या ‘सिम्बा’ चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती, परंतु ‘सिम्बा’मध्ये रणवीर आणि रोहित शेट्टी यांचे सर्वाधिक योगदान असल्याने तिने या चित्रपटांच्या आकड्यांवर दावा करणार नाही असे स्पष्ट केले.

हेही वाचा : दीपिका पदुकोण ‘या’ गोष्टीत आहे हुशार; छुप्या टॅलेंटबद्दल खुलासा करत म्हणाली “फक्त रणवीर आणि बहिणीसमोर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच विकी कौशल आणि सारा अली खान यांची ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. विकी-साराशिवाय चित्रपटात इनामुलहक, नीरज सूद, राकेश बेदी, शारीब हाश्मी, सुष्मिता मुखर्जी यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटाची कथा इंदूरमधील मध्यमवर्गीय जोडप्यावर आधारित असून याचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे.