दीपिका पदुकोण, क्रिती सॅनॉन, कतरीना कैफ, आलिया भट्ट या बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्री आहेत. या अभिनेत्री अभिनयाप्रमाणेच आपल्या ग्लॅमर्स व बोल्ड लूकसाठीदेखील चर्चेत असतात. मात्र बॉलिवूडमध्ये बोल्डनेस सुरु झाला तो ७०-८० च्या दशकात, अभिनेत्री झीनत अमान या त्याकाळातील अभिनेत्री ज्या अभिनयापेक्षा बोल्डनेस आणि आपल्या कपड्यांच्या स्टाईलमुळे चर्चेत राहिल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९७० मध्ये त्यांनी ‘हंगामा’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. सध्या त्या बॉलिवूडमध्ये सक्रीय नाहीत. नुकतंच त्यांनी स्वतःचे इन्स्टाग्राम अकाउंट सुरु केले आहे. इन्स्टाग्रामवर येताच त्यांच्या पहिल्या पोस्टने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले. त्यांनी स्वतःचे काही फोटो शेअर केले आहेत. या वयातही त्यांच्या सौंदर्यात कोणतीही कमतरता दिसून येत नाही. त्यांच्या इन्स्टाग्रामवर येण्याचं नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे. या अकाऊंटच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधायला सुरुवात केली आहे.

आणखी वाचा : “त्यानंतर मी ३ दिवस झोपलो नाही…” एमसी स्टॅनने केला ‘त्या’ थरारक घटनेबद्दल खुलासा

नुकतंच झीनत अमान यांनी त्यांच्या कुर्बानी चित्रपटातील ‘लैला ओ लैला’ या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यानचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. इतकंच नाही तर या पोस्टमध्ये त्यांनी अभिनेत्रींना मिळणाऱ्या कमी मानधनाच्या मुद्दयावरही भाष्य केलं आहे. त्या म्हणतात, “सध्याचं चित्र हे पूर्णपणे बदललं आहे, आता अभिनेत्रींकडे केवळ शोभेची वस्तु म्हणून पाहिलं जात नाही. फक्त आत्तापर्यंत या क्षेत्रात एक गोष्ट अजूनही तशीच आहे ती म्हणजे मानधनातील तफावत. त्या काळात मला सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ओळखलं जायचं, पण पुरुष सहकलाकारांच्या तुलनेत माझं मानधन हे फारच क्षुल्लक असायचं.”

झीनत अमान यांनी आपल्या कारकिर्दीत ‘सत्यम शिवम सुंदरम’, ‘डॉन’, ‘कुर्बानी’, ‘यादों की बारात’, ‘दोस्ताना’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले होते. त्यांची आणि अमिताभ बच्चन यांची जोडी प्रसिद्ध होती. करिअरप्रमाणे त्यांचे खासगी आयुष्यदेखील कायम चर्चेत राहिले. करिअरच्या शिखरावर असताना त्यांनी लग्न केलं, पण त्यांची दोन्ही लग्न अयशस्वी राहिली.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zeenat aman shares a bts video of laila o laila song on instagram speaks about gender pay gap avn
First published on: 26-02-2023 at 11:54 IST