सध्या बॉलिवूडमध्ये ‘बॉयकॉट’ हा ट्रेंड चांगलाच व्हायरल होत आहे. आमिर खान आणि अक्षय कुमारसारख्या सुपरस्टारचे चित्रपट लोकांनी बॉयकॉट केले. आता नेटकरी येणाऱ्या इतरही मोठ्या स्टार्सच्या आणि स्टारकिड्सच्या चित्रपटांना बॉयकॉट करताना दिसत आहेत. शाहरुख खानचा ‘पठाण’, हृतिक रोशनचा ‘विक्रम वेधा’, सलमान खानचा ‘टायगर ३’ या चित्रपटांना बॉयकॉट करायची मागणी होऊ लागली आहे. अशातच आता ‘बॉयकॉट ब्रह्मास्त्र’ हा ट्रेंड काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे.

आणखी वाचा – “मी नकारात्मक गोष्टींपासून…” २४ वर्षांचा संसार अन् सोहेल खानसह घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली सीमा

९ सप्टेंबरला ‘ब्रह्मास्त्र’ बॉक्स ऑफिसवर दाखल होईल. पण त्याचपूर्वी चित्रपटाची होणारी नकारत्मक चर्चा ‘ब्रह्मास्त्र’साठी नुकसानदायी ठरणार का? असे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. इतकंच नव्हे तर ‘बॉयकॉट ब्रह्मास्त्र’च्या गोंधळामध्ये रणबीर कपूरचं जुनं वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

‘रॉकस्टार’ या चित्रपटामध्ये रणबीर मुख्य भूमिकेत होता. त्याचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. पण या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्याने एक धक्कादायक वक्तव्य केलं होतं. खाण्यावर आपलं किती प्रेम आहे? हे रणबीर या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सांगत होता. पण त्याचबरोबरीने तो म्हणाला, “मला गोमांस खायला आवडतं.” त्याचं हे जुनं वक्तव्य आता पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

आणखी वाचा – “ताज हॉटेलमध्ये पहिल्यांदा गेले अन्…” एका चहाची किंमत पाहून हेमांगी कवीच्या भुवया उंचावल्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘ब्रम्हास्त्र’चा अभिनेता गोमांस खातो, आम्ही गोमांस खाणाऱ्या कलाकारांना प्रोत्साहन देत नाही अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तसेच अशा कलाकारांना आणि त्यांच्या चित्रपटांना बॉयकॉट करा असंही नेटकरी म्हणत आहेत. ‘ब्रम्हास्त्र’मध्ये रणबीर कपूर, आलिया भट, अमिताभ बच्चन, मौनी रॉय, नागार्जुन अशी दिग्गज मंडळी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. नकारात्मक चर्चांनंतर चित्रपटाला प्रेक्षकांची कितपत पसंती मिळणार हे पाहावं लागेल.