Lal Singh Chaddha Boycott : आमिर खानचा बहुप्रतिक्षित ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाच्या ट्रेलरची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेरीस या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. आतापर्यंत लाखो लोकांनी हा ट्रेलर पाहिला आहे. २०१८ नंतर आमिर पुन्हा रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. त्यामुळे हा चित्रपट सुपरहिट होईल, अशी चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडे ‘लाल सिंह चड्ढा’चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर अनेकांनी त्यावर संताप व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘लाल सिंह चड्ढा’चा ट्रेलर पाहून का संतापले लोक?
आमिरचा हा चित्रपट ‘फॉरेस्ट गम्प’ या हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक आहे. हॉलिवूड चित्रपटाचा ‘लाल सिंह चड्ढा’ रिमेक असल्यामुळे नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच याआधी आमिरने देश असहिष्णू झाला आहे यांसारखी काही वादग्रस्त विधानं केली होती. यावरुन पुन्हा एकदा नेटकऱ्यांनी त्याला सुनावलं आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी #boycottlalsinghchaddha हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होत आहे.

आणखी वाचा – वाढदिवसापूर्वीच सिद्धू मूसेवाला यांची हत्या, गायकाच्या मृत्युनंतर उपस्थित होणारे ५ मोठे प्रश्न

एका युजरने ट्विटरद्वारे म्हटलं आहे की, “एकीकडे आमिर म्हणतो देश असहिण्षु झाला आहे आणि मी भारत सोडू इच्छितो.” इतकंच नव्हे तर दुसऱ्या युजरने म्हटलं आहे की, “करीना कपूर स्वतः बोलते मी माझे चित्रपट पाहात नाही. तुम्ही देखील हा चित्रपट पाहण्यासाठी जाऊ नका.”

आणखी वाचा – Sidhu Moosewala Top Songs : ‘या’ ५ सुपरहिट गाण्यांमुळे सिद्धू मूसेवाला यांचं बदललं नशिब

त्याचबरोबरीने नेटकऱ्यांनी काही मीम्स देखील शेअर केले आहेत. आमिरसह करीनावर देखील काही जणांनी राग व्यक्त केला आहे.
आमिर जवळपास ४ वर्षांनंतर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर दिसणार आहे.

या चित्रपटानिमित्त आमिर आणि करीना पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसतील. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर काही जणांनी आमिरचं तोंडभरुन कौतुकसुद्धा केलं आहे. या चित्रपटातून आमिर खान एका सामान्य व्यक्तीची कथा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Boycott laal singh chaddha trends on twitter aamir khan and kareena kapoor film trailer released memes viral on social media kmd
First published on: 30-05-2022 at 15:27 IST