अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांची मुख्य भूमिका असलेला ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाचा ट्रेलर अखेरीस प्रदर्शित झाला आहे. अवघ्या दोन तासांमध्ये हजारो लोकांनी हा ट्रेलर पाहिला. ट्रेलर पाहिल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटकऱ्यांनी व्यक्त होण्यास सुरुवात केली आहे. ‘ब्रम्हास्त्र’च्या ट्रेलरमधील काही फोटो शेअर करत नेटकऱ्यांनी याचं कौतुक देखील केलं आहे.

आणखी वाचा – “काल ‘धर्मवीर’ पाहिला पण…”, अमृता खानविलकरच्या ‘त्या’ पोस्टची सर्वत्र चर्चा, प्रसाद ओकबरोबर फोटोही केला शेअर

अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. बऱ्याच जणांनी ‘ब्रम्हास्त्र’च्या ट्रेलरचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. भारतीय चित्रपटसृष्टीमधील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक, इतर भारतीय चित्रपटांसाठी ‘ब्रम्हास्त्र’ आदर्श ठरेल, ट्रेलरने अधिक उत्सुकता वाढवली आहे, बॉलिवूड इज बॅक अशा शब्दांमध्ये नेटकऱ्यांनी या ट्रेलरचं कौतुक केलं आहे.

तसेच गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूडमध्ये फ्लॉप चित्रपटांची मालिका ही सुरुच आहे. ‘ब्रम्हास्त्र’मुळे हिंदी चित्रपट पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरेल असं बोललं जात आहे.

त्याचबरोबरीने चित्रपटामध्ये वापरण्यात आलेल्या तंत्रज्ञानाचं विशेष कौतुक होताना दिसत आहे. दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची कथा पौराणिक कथांवर आधारित आहे. अमिताभ बच्चन (Amibah Bachchan) यांच्या आवाजात या ट्रेलरची सुरूवात होते.

प्रेम, रोमान्स, थ्रिलर आणि सस्पेन्स सारंच या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्यासह बिग बी अमिताभ बच्चन, साऊथ सुपरस्टार नागार्जुन आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री मौनी रॉय यांच्या देखील या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या ९ सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.