‘झी मराठी’वर नुकत्याच सुरू झालेल्या ‘बस बाई बस’ या कार्यक्रमाची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे करत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेल्या महिला या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली होती. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या ‘बस बाई बस’च्या पुढील भागामध्ये दिसणार आहेत.

आणखी वाचा – Video : “शिवडीची केवढी ती इंग्लिश” लंडनमध्ये इंग्रजी भाषेमध्ये संवाद साधताना सिद्धार्थ जाधवची फजिती, व्हिडीओ चर्चेत

‘बस बाई बस’मधील अमृता यांचे काही प्रोमो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. हे प्रोमो पाहिल्यानंतर या भागामध्ये त्या राजकीय परिस्थिती तसेच आपल्या खासगी आयुष्याबाबत भाष्य करताना दिसणार असल्याचं लक्षात येतं. आता अमृता यांचा या कार्यक्रमामधील नवीन प्रोमो सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित करण्यात आला आहे.

‘कशी नशिबाने थट्टा आज मांडली’ हे गाणं ऐकल्यावर कोणाचा चेहरा समोर येतो? असा प्रश्न सुत्रसंचालक सुबोध भावे अमृता यांना विचारतो. यावर त्या उत्तर देतात की, “उद्धवजी ठाकरे यांचा खूप मान आणि सन्मान. पण हे गाणं ऐकल्याबरोबर मला त्यांचाच चेहरा आठवला.” अमृता यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत दिलेलं उत्तर ऐकून नेटकरी यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत.

आणखी वाचा – “तुम्ही प्लास्टिक सर्जरी केली आहे का?” प्रश्नावर अमृता फडणवीसांचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या, “मला ट्रोल केलं पण…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमृता यांचा या व्हिडीओ पाहून काहींनी त्यांना ट्रोल देखील केलं आहे. अमृता या कार्यक्रमामध्ये राजकीय परिस्थितीबाबत अधिक बोलताना दिसणार असल्याचं चिन्ह दिसत आहे. ‘बस बाई बस’मधील त्यांचा हा भाग अधिक चर्चेत असणार हे प्रोमोवरूनच लक्षात येतं.