उर्वशी रौतेला कान्स २०२५ च्या उद्घाटन समारंभाच्या रेड कार्पेटवर मल्टीकलर फ्लोअर-लेंथ गाऊन घालून आली. पण, तिच्या लूकपेक्षाही सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे उर्वशीचा पॅरट क्लच.
उर्वशीने मल्टीकलर स्टोन स्टडेड टियारा आणि एक अनोखा क्लच कॅरी केला होता. अभिनेत्रीचा हा क्लच लाखो रुपयांचा आहे. दी इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, या क्लचची किंमत सुमारे ४.७ लाख रुपये आहे.
इन्स्टाग्राम पेज डायट सब्यानुसार, उर्वशीने कॅरी केलेला पॅरट क्लच डिझायनर ज्युडिथ लीबरचा आहे आणि त्याची किंमत सुमारे ४.६८ लाख रुपये आहे. कान्समध्ये तिने हा क्लच कॅरी केला, जणू काही पाळीव पोपट हातात धरला आहे. उर्वशीने तिच्या लूकपेक्षाही तिचा क्लच कॅमेऱ्यासमोर जास्त प्रमाणात दाखवला. उर्वशीने हे पॅरट क्लच हातात घेऊन सुंदर अशा पोज दिल्या.
उर्वशीच्या ड्रेसबद्दल बोलायचे झाले, तर तिच्या लाँग गाऊनच्या मागच्या बाजूला एक लांब ट्यूल होता. उर्वशीचा मेकअप लूक खूपच ग्लॉसी आणि सुंदर होता. ती या आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत होती.
उर्वशीच्या लूकवर वापरकर्त्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, “सो ब्यूटीफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाइक अ डिझाईन मशीन स्टूडिओ”. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “उर्वशीने ऐश्वर्याचा लूक खराब केला.” एका व्यक्तीने लिहिले, “तिचा मेकअप अनेकांना आवडला नाही, ती जोकर दिसत आहे. एका युजरने उर्वशीला, “ओव्हरड्रेसिंग, ओव्हर मेकअप, ओव्हरअॅक्टिंग”, असे म्हटले आहे.
उर्वशी स्वत:च्या लूकमुळेच ट्रोल
उर्वशीचा क्लच चर्चेत असला तरी, तिच्या आऊटफिटला खूप ट्रोल केले जात आहे. हा आऊटफिट पाहून अनेक वापरकर्त्यांना ऐश्वर्या रायच्या २०१८ च्या कान्स लूकची आठवण झाली आहे. ऐश्वर्याच्या त्या लूकची खूप प्रशंसा झाली होती आणि आजही तो तिच्या सर्वोत्तम लूकपैकी एक मानला जातो.
अभिनेत्री उर्वशी रौतेलाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती शेवटची दक्षिण भारतीय चित्रपट ‘डाकू महाराज’मध्ये दिसली होती. चित्रपटातील एका डान्स स्टेपसाठी अभिनेत्रीला टीकेचा सामना करावा लागला. अलीकडेच ती सनी देओलच्या ‘जाट’ चित्रपटातील ‘टच किया’ गाण्यात दिसली. त्याशिवाय उर्वशी ‘वेलकम टू द जंगल’ व ‘कसूर २’मध्ये दिसणार आहे.