कार्डी बी ही हॉलीवूडमधील प्रसिद्ध रॅपर म्हणून ओळखली जाते. तिने गाण्याच्या रॅप शैलीमुळे जगभरात लोकप्रियता मिळवली आहे. कार्डी बीच्या लाइव्ह कॉन्सर्ट्सला तिचे चाहते मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. अशाच एका लाइव्ह कार्यक्रमामुळे ही हॉलीवूड रॅपर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

हेही वाचा : “तुला लहान मुलांमध्ये काय आवडतं?”, अवधूत गुप्तेंच्या प्रश्नावर सई ताम्हणकरने दिलं भन्नाट उत्तर; म्हणाली, “त्यांच्या नाकातून शेंबूड…”

कार्डी बी परफॉर्मन्स सादर करताना तिच्यावर एका चाहत्याने ड्रिंक फेकले. ड्रिंक फेकल्यानंतर कार्डी चांगलीच संतापली, चाहत्याच्या कृत्यामुळे अस्वस्थ होऊन तिने रागाच्या भरात हातातला माइक त्या चाहत्याच्या दिशेने फेकून मारला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

भर कार्यक्रमात ही घटना घडल्यावर कार्डी बीच्या सुरक्षा रक्षकांनी ड्रिंक फेकणाऱ्या चाहत्याला बाहेर काढले. लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान गोंधळ होण्याची ही पहिलीच वेळ नसून यापूर्वीही अनेक गायकांना अशा घटनांचा सामना करावा लागला आहे. भारतीय गायक अरिजित सिंह, सोनू निगम यांनाही असे अनुभव आले आहेत.

हेही वाचा : “३१ डिसेंबरच्या रात्री खूप दारु प्यायलो अन्…”, प्रियदर्शन जाधवने सांगितली आयुष्यातील कटू आठवण; म्हणाला, “त्या नाटकातून…”

हेही वाचा : Video : “देव करो अन् सर्वांना…”, सई ताम्हणकर आणि प्रार्थना बेहरेने गायलं सोनालीसाठी खास गाणं, अभिनेत्रीने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कार्डी बीने २०१५ मध्ये व्हीएच १ वाहिनीवरील टेलिव्हिजन शो ‘लव्ह अँड हिप हॉप: न्यूयॉर्क’ या कार्यक्रमातून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. दरम्यान, कार्डी बीने रागात माइक फेकल्याच्या कृतीचे तिच्या इतर चाहत्यांनी सोशल मीडियावर समर्थन केले आहे. एका युजरने म्हटले आहे की, “कलाकारांवर सामान, वस्तू फेकणाऱ्या या लोकांना वेड्यांच्या रुग्णालयात भरती केले पाहिजे.” तसेच दुसऱ्या एका युजरने, “आजकाल या गर्दीपासून दूर राहण्याची आवश्यकता आहे. लोकं वेडी झाली आहेत.” अशी प्रतिक्रिया या व्हायरल व्हिडीओवर दिली आहे.