शाहरूखच्या आर्यन आणि सुहाना या मुलांना तुम्ही माध्यमांमधून अनेकवेळा पाहिले असेल. शाहरुखच्या अब्राम या मुलाची एक झलक तुम्हाला या छायाचित्रात दिसते आहे. मे महिन्यात जन्मलेल्या या मुलाला अजून सर्वांसमोर आणण्यात आलेले नाही. १६ ऑक्टोबरला ईदच्या दिवशी शाहरुखच्या ‘मन्नत’ बंगल्याच्या एका बाल्कनीत देखभाल करणाऱय़ा मावशींच्या कुशीमध्ये अब्रामची झलक पाहायला मिळाली. या मावशी अब्रामला खाऊ घालताना आणि अन्य दोन महिला दुस-या बाल्कनीत उभ्या असलेल्या दिसल्या.

ईदचा दिवस असल्याने आपली एक झलक पाहण्यासाठी उभ्या असलेल्या चाहत्यांना अभिवादन करण्यासाठी शाहरुखदेखील बंगल्याच्या बाहेर आला होता. आपल्या चाहत्यांना अभिवादन करून जेव्हा शाहरूख बंगल्यात परतला आणि चाहते देखील निघून जायला लागले. त्याचवेळेस अब्राम आणि या आया बाल्कनीमध्ये दिसल्या. शाहरूख आणि गौरी खानच्या या अपत्याचा जन्म सरोगसीद्वारे झाला आहे. या मुलाच्या गर्भलिंगचाचणीवरून वादळ उठले होते.