scorecardresearch

‘या’ बॉलिवूड अभिनेत्यामुळे सुरु झाला ‘चला हवा येऊ द्या’ शो

निलेश साबळेने एका मुलाखतीत हा खुलासा केला होता.

chala hawa yeu dya riteish deshmukh
निलेश साबळेने एका मुलाखतीत हा खुलासा केला होता.

चला हवा येऊ द्या हा शो प्रेक्षकांच्या मनात घर करून बसला आहे. शोमधील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. शोचा सुत्रसंचालक आणि अभिनेता, कॉमेडियन, लेखक, दिग्दर्शक म्हणून सगळ्यांना माहित असलेला निलेश साबळेचा आज ३० जून रोजी वाढदिवस आहे. निलेशच्या सुत्रसंचालनाचे तर लाखो चाहते आहेत. पण तुम्हाला माहितीये ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाची सुरुवात होण्याचं संपूर्ण श्रेय हे अभिनेता रितेश देशमुखला जातं.

आणखी वाचा : तुकाराम महाराजांची बायको खरंच खूप कजाग होती का? मुलीचा विचित्र प्रश्न ऐकता किरण माने, म्हणाले…

निलेशने भाडिपाच्या रेडी टू लीड या सगमेन्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी निलेशला प्रश्न विचारला की शो सुरु करण्याआधी काही गोष्टी डोक्यात होत्या का? आणि शो कसा सुरु झाला? यावर उत्तर देत निलेश म्हणाला, “माझ्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टी अपघाताने घडला. ‘फू बाई फू’ पाच वर्ष त्यावेळी चाललं होतं. त्याचवेळी रितेश देशमुखांचा ‘लई भारी’ हा चित्रपट आला होता. तर रितेश यांनी झी कडे विचारणा केली होती की हिंदीप्रमाणे आपल्याकडे एक-दीड तास प्रमोशन करता येईल असा मोठा प्लॅटफॉर्म आहे का? असा प्लॅटफॉर्म आपल्याकडे नव्हता. त्यावेळी मला झी मधून फोन आला की त्यांची अशी इच्छा आहे की असा एक एपिसोड करायचा आहे.’

आणखी वाचा : “अचानक कोणी तरी कारची खिडकी ठोठावली अन्…”, बिग बींना ‘या’ बॉलिवूड कलाकाराने दिला सुखद धक्का

आणखी वाचा : आलिया प्रेग्नेंट! कंडोम कंपनीने भन्नाट पोस्ट शेअर करत दिल्या शुभेच्छा

पुढे निलेश म्हणाला, “कधी एपिसोड करायचा आहे असं विचारल्यावर चॅनेलकडून ‘परवा’ असे उत्तर आले. एक संपूर्ण शो जवळपास १६-१७ तासांत उभ करणं त्याला सुरुवातीला कठीण वाटलं होतं. पण चॅनेलने ‘लई भारी’च्या प्रमोशनसाठी निलेशवर विश्वास दाखवला होता. त्यावेळी या संधीचं सोनं करण्यासाठी त्याने हा शो करण्याचे ठरवले. आता ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये काम करणाऱ्या सर्वांना निलेशने फोन केला, पण तेव्हा त्यांच्या तारखा नव्हत्या. केवळ भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांचा होकार निलेशला मिळाला.

आणखी वाचा : “मी एक स्त्री आहे पार्सल नाही…”, प्रेग्नेंसी न्यूजवर संतापली आलिया भट्ट

भाऊ आणि कुशलविषयी बोलताना निलेश म्हणाला की, “कुशल आणि भाऊ अशी माणसं आहे की तुझ्यासाठी कायपण आणि कधीपण! रात्री १०-११ वाजता त्याच्या घरी गेलो. त्याच्याच मुलाच्या शाळेच्या वहिची पानं फाडली आहे त्यावर २-३ पानांची स्क्रीप्ट लिहिली. ज्या गोष्टी आम्ही मेकअप रुममध्ये बोलायचो त्यातून ही स्क्रीप्ट तयार झाली. त्यातून तीन तासाचं फुटेज तयार झालं म्हणून आम्ही दोन एपिसोड करायचं ठरवलं. हे दोन्ही एपिसोड टेलिकास्ट झाल्यानंतर त्याचं रेटिंग आलं, चांगला प्रतिसाद मिळाला त्यावेळी ठरलं याचा आपण शो करायला हवा.”

आणखी वाचा : “शरद पोंक्षे कधीही काहीही विसरत नाही”, आदेश बांदेकर यांच्या पोस्टवर अभिनेत्याचे सडेतोड उत्तर

अशाप्रकारे ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम सुरू झाला होता. आज आठ वर्ष हा कार्यक्रम महाराष्ट्राला हसवत आहे. यातील कलाकारांनी परदेशातही शो केले. मराठीपासून हिंदीपर्यंत अनेक दिग्गजांनी या शोमध्ये उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमाच्या यशामध्ये नक्कीच निलेश साबळे याचा सिंहाचा वाटा आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chala hawa yeu dya just started because of this bollywood actor dcp

ताज्या बातम्या