Charu Asopa and Rajeev Sen Romantic Photos Viral : अभिनय क्षेत्रात काम करणारे कपल खऱ्या आयुष्यात जरी वेगळे झाले तरी बऱ्याचदा आपल्या मुलांसाठी एकत्र राहणं योग्य मानतात. अशीच एक टीव्ही अभिनेत्री आहे, जिने तिच्या पतीवर त्याच्यापासून वेगळे झाल्यावर अनेक गंभीर आरोप केले होते आणि आता घटस्फोटानंतरही ती एक्स पतीबरोबर राहत आहे. दोघांना एकत्र पाहून लोकांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले आहे.
आम्ही चारू असोपा आणि राजीव सेनबद्दल बोलत आहोत. हे दोघे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सतत चर्चेत असतात. त्यांचा घटस्फोट झाला असला तरी त्यांच्या मुलीमुळे ते अनेकदा एकत्र वेळ घालवताना दिसतात. काही दिवसांपूर्वी, चारू तिची मुलगी आणि एक्स पती राजीवबरोबर थायलंडला गेली होती. त्या प्रवासादरम्यान चारूने तिच्या एक्स पतीबरोबर अनेक रोमँटिक फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. आता दुर्गापूजेच्या वेळी चारू आणि राजीव पुन्हा एकत्र दिसले.
दोघेही एकत्र दुर्गापूजेला गेले आणि शेवटी कन्यापूजन केले. चारू राजीव सेनच्या घरी दुर्गापूजेसाठी गेली. तिने संपूर्ण कुटुंबासह दुर्गापूजेचा आनंद घेतला. दुर्गापूजा संपल्यानंतरही चारू अजूनही कोलकात्यात आहे आणि नवीन ठिकाणी फिरत आहे.
या काळात ती एकटी नाहीये; तिचा एक्स पती राजीव सेन देखील तिच्याबरोबर आहे. चारूने अलीकडेच इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. त्या फोटोंमध्ये चारू पिवळ्या साडीत खूपच सुंदर दिसत आहे. नवीनतम फोटोमध्ये चारू नवमीला तिची मुलगी जियानाकडून आशीर्वाद घेताना दिसत आहे.
चारू आणि राजीवचे रोमँटिक फोटो
या आई-मुलीच्या फोटोंचे सर्वत्र कौतुक होत आहे. पण, एका फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोशल मीडिया वापरकर्ते त्यावर चर्चा करत आहेत. खरंतर, चारू आणि राजीव सेन रोमँटिक पोज देताना दिसत आहेत, यामुळे सोशल मीडियावर चर्चा होत आहे. काही जण म्हणत आहेत की ते परत एकत्र येणार आहेत, तर काही जण म्हणतात की या जोडप्याने त्यांच्या मुलीसाठी त्यांचा अहंकार बाजूला ठेवला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चारू आणि राजीव यांचे फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे. “हे कसलं नातं आहे? घटस्फोटानंतरही कपल फोटो पोस्ट करत आहेत, अशा लोकांनी नातेसंबंधांची थट्टा केली आहे.” “हे दोघे वेगळे झाले होते, आता एकत्र आलेत का? चारू मॅडम, तुम्ही तर साड्या विकत होता ना?, मग तुम्ही घटस्फोट का घेतला?” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
चारू असोपा घटस्फोटानंतर मुंबई सोडून तिच्या मुलीसह जयपूरला स्थायिक झाली होती. चारू आणि तिचा एक्स पती राजीव सेन गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी दोघेही एकत्र परदेशी सहलीला गेले होते.