मराठी चित्रपटाशी पुन्हा एकदा जोडलं जातंय खिलाडी कुमारचं नाव

एक अभिनेता आणि निर्माता म्हणून अक्षय कुमारने आत्तापर्यंत हटके आणि अर्थगर्भ चित्रपटांची निवड केली आहे.

akshay kumar
अक्षय कुमार, akshay kumar

एक अभिनेता आणि निर्माता म्हणून अक्षय कुमारने आत्तापर्यंत हटके आणि अर्थगर्भ चित्रपटांची निवड केली आहे आणि त्याशिवाय त्यांच्यामागे तो खंबीरपणे उभा राहिला आहे. सध्याच्या घडीचा बी- टाऊनच्या या खिलाडी कुमारचं नाव पुन्हा एकदा मराठी चित्रपटसृष्टीशी जोडलं गेलं आहे. ‘रुस्तम’मधील भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेल्या या हरहुन्नरी कलाकाराने विविधांगी भूमिकांनी अनेक चित्रपट गाजवले आहेत. ‘पद्मश्री’ने सन्मानित या कलाकाराने जेव्हा मराठी चित्रपट ‘चुंबक’ पाहिला तेव्हा त्याने तो प्रभावित झाला आणि या चित्रपटाची प्रस्तुती करण्याची जबाबदारी घेतली.

सोशल मीडीयावरून ही बातमी ‘ब्रेक’ करण्यासाठी अक्षय कुमारने एक व्हीडीओ प्रसारित केला आहे. “काहीतरी अत्यंत प्रामाणिक आणि शुद्ध पाहण्याचा योग आला…ती गोष्ट माझ्या डोक्यात एखाद्या ‘चुम्बका’सारखी पक्की बसली आहे. ती तुमच्याबरोबर शेअर करावीशी वाटली. मला तुमचे केवळ एक मिनिट हवे आहे.”

वाचा : Blog : ‘धडक’च्या जान्हवीला बघण्यासाठी श्रीदेवी तू आज हवी होतीस!

प्रख्यात लेखक, गायक, अभिनेता आणि दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते गीतकार स्वानंद किरकिरे हे ‘चुंबक’मध्ये मध्यवर्ती भूमिकेत आहेत. होतकरू कलाकार साहिल जाधव आणि संग्राम देसाई हेसुध्दा या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमधून पदार्पण करत आहेत. चुंबकचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते संदीप मोदी यांनी केले असून चित्रपटाचे लेखन त्यांनी सौरभ भावे यांच्याबरोबर केले आहे. नरेन कुमार यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. अक्षय कुमार प्रस्तुत मराठी चित्रपट ‘चुंबक’ संपूर्ण महाराष्ट्रात २७ जुलै २०१८ रोजी प्रदर्शित होत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Chumbak movie presented by akshay kumar will release very soon