काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध कॉमेडीयन राजू श्रीवास्तव यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीने सगळ्यांनाच धक्का बसका. त्या धक्क्यातून लोक सावरत नाहीत तोच आणखी एका लोकप्रिय विनोदवीराच्या निधनाची बातमी समोर आली आहे. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ शोच्या पहिल्या सीझनमधून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलेल्या विनोदवीर पराग कंसारा यांचे निधन झाले आहे.

आणखी वाचा : Video: ‘आदिपुरुष’ला मिळणाऱ्या प्रतिक्रियांमुळे प्रभास दिग्दर्शक ओम राऊतवर चिडला?, व्हिडिओ व्हायरल

गुजरातमधील वडोदरा येथे हृदयविकारच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. पराग कंसारा यांच्या निधनाची बातमी कॉमेडीयन सुनील पाल यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत दिली आहे. या व्हिडीओत ते म्हणाले, “नमस्कार आणखी एक हृदय हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे आणि तीही कॉमेडी विश्वातून. ‘लाफ्टर चॅलेंज’ या शोमधील आमचे मित्र पराग कंसारा यांनी जगाचा निरोप घेतला आहे. ‘उलटा सोच’ असं म्हणत जे सगळ्यांना उलटा विचार करण्यास सांगून खळखळून हसवत होते तेच पराग कंसारा आज आपल्यात नाहीत.” पराग हे अत्यंत उत्कृष्ट आणि मुरलेले कलाकार होते असेही सुनील पाल व्हिडिओत म्हणाले. पराग कंसारा यांच्याबद्दल बोलताना सुनील पाल अत्यंत भावुक झाले होते.

हेही वाचा : “त्याने अनेक वर्षे अनेकांना हसवले पण…”, राजू श्रीवास्तव यांच्या शोकसभेत जॉनी लीव्हर झाले भावुक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ शोच्या पहिल्या सीजनमध्ये पराग कंसारा स्पर्धक म्हणून आले होते. ‘लाफ्टर चॅलेंज’ मधून प्रसिद्धी मिळाल्यानंतर त्यांनी हजारो स्टँडअप कॉमेडीचे लाईव्ह शो केले होते. सुनील पाल यांच्या या व्हिडीओवर कमेंट्स करत नेटकरी पराग कंसारा यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करत आहेत.