‘कौन बनेगा करोडपती’ शोच्या मंचावर बिग बी अमिताभ बच्चन स्पर्धकांसोबत मनमोकळ्या गप्पा मारत धमाल करताना दिसतात. तर हॉट सीटवर बसलेले स्पर्धक देखील बिग बींसोबत अनेक अनुभव शेअर करत असतात. नुकताच या शोचा एक नवा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. यात स्पर्धकाने बिग बींच्या डिझायनर कोटवर अशी कमेंट केली की बिग बी देखील हैराण झाले.

येत्या भागात प्रांशु त्रिपाठी यांना हॉट सीटवर बसण्याती संधी मिळाल्याचं या प्रोमोत दिसतंय. यावेळी प्रांशु बिग बींसोबत धमाल गप्पा मारत आहेत. प्रांशु बिग बींना त्याच्या कोटवर कमेंट करत म्हणतात, “सर मला तुम्हाला काही सांगायचं होतं. माझ्याकडे देखील असा सूट आहे. मात्र त्याला असा खिसा नाही. हे खूप बेकार वाटतं. अजिबात चांगल दिसत नाही. अशा प्रकारचे सूट लग्नात घालतात.” असं प्रांशु म्हणत असताना बिग बी मात्र हैराण झाले. प्रांशुच्या या कमेंटवर बिग बी म्हणाले, “हा खेळ संपला की मी तुम्हाला सूट देऊन टाकतो”

“राज कुंद्राकडेही खूप टॅलेंट आहे”; ‘इंडियाज गॉट टॅलेंट’चा प्रोमो शेअर केल्याने शिल्पा शेट्टी ट्रोल

दरम्यान या शोमध्ये प्रांशू हे एक कोटी रुपयांच्या प्रश्नापर्यंत पोहचल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय. प्रांशु यांनी या प्रश्नाचं उत्तर देत एक कोटी रुपये जिंकले की त्यांनी गेम सोडला हे तर येत्या भागातच कळेल. त्यामुळे हा एपिसोड पाहणं खूपच उत्सुकतेच ठरणार आहे.