२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ सध्या फलंदाजीच्या बाबतीत चांगलाच अडचणीत सापडला आहे. पहिले ४ सामने जिंकल्यानंतर भारताला अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजविरुद्ध कडवी झुंज मिळाली. शिखर धवन दुखापतीमुळे माघारी परतल्यानंतर, संघात चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजीचा प्रश्न अद्याप सुटलेला नाहीये. शिखरच्या अनुपस्थितीत विजय शंकरला संघात जागा देण्यात आली, मात्र त्यालाही आश्वासक धावसंख्या उभारता आली नाहीये.

सध्या संपूर्ण देशभरात विश्वचषकाचा फिव्हर सुरु आहे. प्रत्येक चाहता आपापल्यापरीने भारतीय संघाला विविध पर्याय आणि सल्ले देत आहे. यामध्येच प्रसिद्ध मराठी अभिनेत्री स्पृहा जोशीने, संघात चौथ्या क्रमांकाच्या जागेसाठी एक पर्याय सुचवला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्पृहाने आपला हातात बॅट घेतलेला एक फोटो ट्विटर अकाऊंटवर शेअर करत, चौथ्या क्रमांकाच्या जागेसाठी माझा विचार व्हायला हरकत नाही असं गमतीने म्हटलंय. महत्वाची गोष्ट म्हणजे या फोटोवर तिच्या चाहत्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.