भारताचा स्टार क्रिकेटर महेद्रसिंह धोनीने त्याच्या उत्कृष्ट कारकि‍र्दीने क्रिकेटचं मैदान गाजवलं. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आजही चाहते त्याला मैदानावर मिस करतात. क्रिकेट जगतावर राज्य केल्यानंतर धोनीने त्याची पावलं मनोरंजन विश्वाकडे वळवली आहेत.

धोनीच्या प्रोडक्शन हाऊसच्या पहिल्या चित्रपटाचं पोस्टर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आलं होतं. त्यानंतर आता धोनीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये धोनी खाकी वर्दीत हातात काठी व पिस्तुल घेऊन दिसत आहे. एका ट्वीटर अकाऊंटवरुन धोनीचा हा फोटो शेअर करण्यात आला आहे. धोनीच्या आगामी जाहिरातीतील हा फोटो असल्याचं म्हटलं गेलं आहे. या जाहिरातीत धोनी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे.

हेही वाचा>> ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात अडकली विवाहबंधनात, पहिला फोटो समोर

धोनीच्या पोलीस अधिकाराच्या भूमिकेतील हा फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. या फोटोवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. एकाने ‘थाला’ अशी कमेंट केली आहे.

ms dhoni photo viral

तर दुसऱ्याने ‘सिंघम ३’ चित्रपटात दिसणार असल्याचं कमेंट करत म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
ms dhoni photo viral

हेही वाचा>> आदिल खानचं दुसऱ्या मुलीबरोबर अफेअर; राखी सावंतचे पतीवर गंभीर आरोप, म्हणाली “त्याने कुराणवर हात ठेवून…”

महेंद्रसिंह धोनीने ‘धोनी एंटरटेनमेंट प्रायव्हेटेड लिमिटेड’ ही निर्माती कंपनी सुरू केली आहे. धोनीची निर्माती कंपनी चित्रपटांची निर्मिती करणार आहे. काही दिवसांपूर्वीच धोनीच्या निर्माती कंपनीच्या ‘एलएसजी: लेट्स गेट मॅरीड’ या पहिल्या चित्रपटाची घोषणा केली आहे.